Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

कन्हैया कुमार यांच्या उपस्थितीत होणार सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचा समारोप

पुणे : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे 17 वे वर्ष आहे. या सप्ताहाचा समारोप 9 डिसेंबर रोजी काँग्रेस भवनच्या मैदानावर होणार असून यावेळी युवा नेते कन्हैया कुमार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले उपस्थित असणार आहेत, अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषद दिली.

या पत्रकार परिषदेला आमदार मोहन जोशी, पुणे शहर ओबीसीचे अध्यक्ष प्रशांत सुरसे उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले , या सप्ताहा अंतर्गत रांगोळी स्पर्धा, ब्लड कॅम्प ,चष्मे वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.  या वर्षी विशेष म्हणजे आपल्या 71 व्या युद्धाला पाकिस्तान वर भारतीय सैन्याने विजय मिळवला. म्हणून माजी सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

 

Leave a Reply