Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

दिलासादायक : आज पुणे शहरात कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद नाही

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात74 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 92रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या एकही मृत्यूची नोंद नाही.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 72 हजार 48 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 370 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुणे ग्रामीण भागात गेल्या 24 तासात 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9105 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 773 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 79रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4911 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply