Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

पुणे : येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धानोरी, नागपूरचाळ, येरवडा प्रभागातील नागरी समस्यांचा महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येरवडा क्षेत्रीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाच्यावतीने या परिसरातील नागरी समस्या जाणून घेण्यासाठी “वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत 700 हून अधिक नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी सांगितलेला विविध सार्वजनिक समस्या महापालिका प्रशासनाकडे मांडण्यासाठी या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिन्ही प्रभागातील सार्वजनिक स्वच्छता,ड्रेनेज,पाणीपुरवठा,पथदिवे, अंतर्गत रस्ते, शाळा, दवाखाना यांची माहिती घेण्यात आली. प्रभागाचा विकासासाठी येणारा निधी त्या ठिकाणी खर्च होतो का? हेदेखील तपासण्यात आले. मात्र प्रत्यक्षात निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करत स्वःहिताची “चमकोगिरिची” दिखाऊ कामे करताना दिसून येतात. नागरिकांच्या करातून मिळणारा कोट्यावधी रुपयांचा निधी अनावश्यक कामांसाठी खर्च केला जातो. ठेकेदारांचे हित सांभाळत त्याला महापालिका अधिकारी देखील सामील असतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष विवेक लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल गुजर, महासचिव जितेंद्र जाधव, महेश कांबळे, प्रदेश युवक कार्यकारिणी सदस्य ऋषीकेश नांगरे-पाटील, उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड, बाबा वाघमारे, सदस्य सोमनाथ पानगावे, सुनील धेंडे, विद्यार्थी आघाडी चे शुभम चव्हाण, वडगाव शेरी महिला अध्यक्षा छाया बनसोडे, रेखा जाधव, स्वीटी कांबळे उपस्थित होते.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी मतदार संघ महासचिव रुपेश शेळके, उमेश साळवी, वाल्मीक सरतापे,राजेंद्र अल्हाट, संजय कांबळे, राम गायकवाड, राज ओव्हाळ, राहुल चांदेकर, प्रकाश कांबळे, आहार खान, बाळासाहेब कांबळे, गौतम ओव्हाळ, नाना म्हस्के, विजयानंद कांबळे, स्वप्नील आल्हाट,अजहर खान, सुरेश गायकवाड, अशोक ओव्हाळ तुकाराम बनसोडे यांनी सहकार्य केले.
महापालिका सहाय्यक आयुक्त वैभव कडलक यांनी यावेळी निवेदन स्वीकारले. तसेच तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रलंबित नागरी समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Reply