आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण
पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या वाढली असून पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 85नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 45रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 68हजार 881इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 96हजार910इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातीलतर0
पुणेमहापालिका हद्दीबाहेरील1रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9103जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 868रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 94रुग्ण गंभीर आहेत आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5227 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
