चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावं की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या variant बद्दल अंदाज कोणालाही येत नाहीये. अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया. जयभीम!

Leave a Reply

%d bloggers like this: