मुंबई हीच आर्थिक राजधानी आहे आणि राहील नवाब मलिक यांचा भाजपला टोला

पुणे:भाजप येण्याऱ्या महानगरपालिका निवडणूकी मध्ये आपली सत्ता यावी यासाठी प्रयत्न करत आहेत त्यावर आज मुंबई कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी गांधीनगर हे आर्थिक राजधानी होऊ शकत नाही, मुंबई हीच आर्थिक राजधानी आहे आणि राहील. असे राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यांनी पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांना पत्रकारानी विचारले येण्याऱ्या महानगरपालिका निवडणूकित कोणाची सत्ता येईल तेव्हा त्यांनी भाजपला टोला लगावला.

नवाब मलिक म्हणाले,भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षाना एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेतायत काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात पर्याय उभा करतोय..त्याची चिंता भाजपला लागली असून आमच्यात कशी फूट पडेल हे बघताहेत, मात्र त्यांनी त्याच्या NDA कडे लक्ष द्यावं.गोव्यात सरकार राहील का नाही याची चिंता करा.असा टोला नवाब मलिक यानी भाजपला लगावला.

खोटे बोलण्यात भाजप प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते.असेही नवाब मलिक म्हणाले. मोदी निवडणूक हे पुलवामा हल्ला च राजकीय फायदा घेऊन जिंकलेत. 2019 च बघू नका, 2024 ला केंद्रातून मोदी सरकार जाणार आहे हे निश्चित आहे.अशीही टीका ऱ्यांनी भाजपवर केली. देशात वेगवेगळे प्रश्न असताना युपीएच्या बैठकीत ज्यावर चर्चा व्हायला हवी होती त्या झाल्या नाही हे सत्य आहे. शरद पवार हे एक चाणक्य आहेत हे सगळ्याना माहितीय.देशात सर्व पक्षांची मोट बांधताना काँग्रेसला सोबत घेऊनच जाणार आहोत.असेही नवाब मलिक म्हणाले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: