Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

एखाद्या राज्यापुरता मर्यादित पक्ष भाजपचा पर्याय होऊ शकत नाही – नाना पटोले

पुणे: काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय आहे. देशातील जनतेचा गांधी कुटुंबावर आणि काँग्रेसवर विश्वास आहे. एखाद्या राज्यापुरता मर्यादित पक्ष भाजपचा पर्याय होऊ शकत नाही. असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी व्यक्त केला.

पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले, या जातिवंत देशाचे देशोधडी करणाऱ्या भाजप सरकारवर लोकांचा विश्वास उडाला आहे अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही घटक पक्षांबरोबर एकत्र येऊन लढणार आहोत. नक्कीच या निवडणुकीमध्ये भाजप पराभूत होईल. असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading