कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आहे. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, दुपारी एक वाजता पार्थिव कोल्हापूर या ठिकाणी आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
