महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेतर्फे पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्कूल मालकांना अर्थसहाय्य

पुणे : महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेतर्फे पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्कूल मालकांना अर्थ सहाय्य करण्यात आले. राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या हस्ते हे अर्थ सहाय्य प्रदान करण्यात आले. यावेळी ढाकणे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच चांगले ड्रायव्हर्स घडवण्या संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघुले उपस्थित होते.

यावेळी देवरामजी बांडे व महेश ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश शिळीमकर यांचा सत्कार उप परिवाह आयुक्त लक्ष्मण दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दराडे यांनी मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या सोडवण्याचे आश्वासनही दिले.

या कार्यक्रमास उत्तम पाटील, मकसुद खान, अरुण कांबळे, विकास काळे, शब्बीर मुल्ला, धर्मेश सचदे, धम्मशील बोरकर, मधुकर पाटील, एकनाथ ढोले, चंदन ढाकणे, ज्ञानेश्वर कुकडे, नजीबबूल्लाह शेख, सिमा पाटील आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव सोपान ढोले यांनी प्रास्ताविक केले. तर विजायकुमार दुग्गल यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: