भोदूबाबा मनोहर भोसलेला पोलिसांनी केले अटक

पुणे – संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगून फसवणुक करणारा सोलापूर जिल्ह्यातील उंदरगावचा मनोहर मामा भोसले( वय ३९) याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने साता-यात ताब्यात घेतले जाणार आहे. अवतारी पुरुष असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात मनोहर भोसले फरार होता.

पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय प्रतिंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

बारामतीचे रहिवाशी असलेल्या शशिकांत सुभाष खऱात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करण्याचा दावा करून त्याला बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केल्याची फिर्याद खरात यांनी दिली होती. पैसे परत मागितल्यावर ठार मारण्याची धमकी दिली असेही तक्रारीत म्हटले आहे.

संत बाळूमामा देवस्थान आदमापूर ट्रस्टच्यावतीनेही मनोहरमामा आणि बाळूमामा देवस्थानचा काहीही संबंध नसून लोकांनी या मामांच्या भुलथापांना फसू नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान गुरुवारी भोसलेसह दोघांविरोधात करमाळ्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार करमाळा पोलिसांची तीन पथके मनोहर भोसले याच्या मागावर आहेत. वेगवेळ्या ठिकाणी ही पथके आहेत, असे करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

%d bloggers like this: