Monday, June 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल – राजेश टोपे

पुणे : राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सहभागी होवून लस घ्यावी, लस घेतांना नागरिकांनी मनात कोणतीही भिती बाळगू नये, कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल आहे, त्यामुळे सर्वांनी लस घेतली पाहिजे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.

लसीकरणाच्या प्रचार व प्रसिद्धीवर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पुणे येथील राष्ट्रीय शीतसाखळी संशाधन केंद्र येथे नव्याने बांधलेल्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन तसेच शीतशाखळी उपकरणे चाचणी प्रयोगशाळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर व्यासपिठावर आमदार दिलीप मोहिते, आमदार चेतन तुपे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक डॉ. रामास्वामी एन, संचालक डॉ. अर्चना पाटील होते.

टोपे म्हणाले, राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्र हे राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त पुढाकाराने कार्यान्वयीत करण्यात आले असून देशपातळीवरील हे एकमेव केंद्र आहे. या संसाधन केंद्राकडून देशभरात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शीतसाखळीचे व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी शासनास विविध प्रकारे तांत्रिक सहकार्य करण्यात येणार आहे. शीतसाखळी सुव्यवस्थापन संदर्भातील धोरणे तथा मार्गदर्शक तत्वे ठरविण्यामध्ये ह्या संसाधन केंद्राची अत्यंत महत्त्वाची भुमिका राहणार आहे तसेच राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील प्रतिनिधित्व या संसाधन केंद्राचे असणार आहे. केंद्र अद्यावत राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी देशातील विविध राज्यातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहे.

विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्र हे आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक टप्पा आहे. लसीकरणाबाबतीत पुणे हे जागतिक पातळीवर मोठे केंद्र म्हणून ओळखले
जाते आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मापदंड पाळून या केंद्राची उभारणी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading