Friday, June 19, 2026
Latest NewsNATIONALTECHNOLOGY

५८% भारतीय विद्यार्थ्यांना अपारंपरिक विषय ऑनलाइन शिकण्यात रस

मुंबई : भारतीय विद्यार्थी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या मुख्य प्रवाहाच्या पलिकडील विषय शिकण्यास पसंती देत आहेत. प्रादेशिक आणि परदेशी भाषा शिकण्यात तसेच मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्रसारखे विषय शिकण्यामध्ये विद्यार्थ्यांना रुची असल्चेयाचे ‘ब्रेनली’ या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने ई- लर्निंगचे परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

या सर्वेक्षणात १,९६३ विद्यार्थी सामील झाले होते. त्यातील ४२% विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजीसह त्यांना हव्या असलेल्या विषयांसाठी चांगले स्रोत उपलब्ध आहेत. या उलट ५८% विद्यार्थ्यांना वाटते की, त्यांच्या आवडीच्या अपारंपरिक विषयांत मदतीसाठी योग्य स्रोत उपलब्ध नाहीत. यात संस्कृत (१२%), मानसशास्त्र (१०%), राज्यशास्त्र (९%), तत्त्वज्ञान (६%) आणि इतर (२०%) आदींचा समावेश आहे. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या पारंपरिक त्रिकुटापलिकडे ऑनलाइन शैक्षणिक स्रोत वाढवून या गटातील ग्राहकांच्या गरजा पुरवल्या पाहिजेत.

या सर्वेक्षणात, भारतीय विद्यार्थ्यांनी घरी राहून शिकताना कोणत्या विषयाचा सर्वाधिक आनंद घेतला, हे शोधण्यात आले. तेव्हा गणित, विज्ञान आणि भाषा (इंग्रजी किंवा इतर) या विषयांना समान २३% मते दिली गेली. त्यानंतर समाजशास्त्र आणि कंप्यूटर/तंत्रज्ञान इत्यादींचा क्रमांक लागतो. त्यांनाही दूरस्थ शिकणाऱ्यांनी प्रत्येकी ११% मते दिली आहेत. घरी राहून शिकताना बहुतांश रिमोट लर्नर्सनी (३३%) गणितासाठी सर्वाधिक मदत लागल्याचे सांगितले. त्यानंतर विज्ञान (२३%), इंग्रजी (१७%), सोशल सायन्स (१३%) आणि कंप्यूटर/ तंत्रज्ञान (९%) यांचा क्रमांक लागतो.

कठीण विषयाचा अभ्यास करताना कोणत्या स्रोताची सर्वाधिक मदत झाली हे विचारले असता, एक तृतीयांश (३३%) सहभागींनी अभ्यासात मदत करणाऱ्यांमध्ये ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मला पसंती दिली. उर्वरीत विद्यार्थ्यांनी (३२%) पुस्तके आणि सर्च इंजिन्स (३०%) या पर्यायांकडून अभ्यास करताना पूरक मदत घेतल्याचे सांगितले. तर दुसरीकडे, सर्वेक्षणात दिसून आले की, ५% विद्यार्थ्यांनी शिकतानाच होम ट्युशन्स, कोचिंग क्लासेस किंवा सेल्फ स्टडी आदींची मदत घेतली.

ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणाले, आजकालच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे शाळेपुरतेच मर्यादित नाही. महामारीने विद्यार्थ्यांना वर्गात येण्यापासून रोखलेले असले तरीही ऑनलाइन लर्निंग साधने विद्यार्थ्यांना मदत करत आहेत, हे सर्वेक्षणातून दिसले. मात्र गणित, विज्ञान आणि इंग्रजी या पारंपरिक त्रिकुटापलिकडील विषयांसाठी विश्वसनीय ऑनलाइन सामग्रीची उपलब्धता कमी असल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading