Tuesday, June 16, 2026
Latest NewsLIFESTYLE

आयबीडी हा रोग मुख्यतः आढळून येतो मोठ्या आतड्यांमध्ये व काहीसा लहान आतड्यांमध्ये

19 मे हा जागतिक आयबीडी दिवस म्हणून संबोधण्यात येतो.डॉ. सुरेश जैन, (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट), डायजेस्टीव्ह एंडोस्कोपी क्लिनीक, पुणे यानी आयबीडी च्या जागृतीसाठी खालील लेख लिहिला आहे.आयबीडी हा रोग मुख्यत तो मोठ्या आतड्यांमध्ये व काहीसा लहान आतड्यांमध्ये आढळून येतो. यात आतड्यांना फार सूज येते त्यात लहान लहान जखमा होतात व त्यातून रक्तस्त्राव होतो.  अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रोन्स डिसीज हे आयबीची दोन मुख्य उपप्रकार आहेत. अल्सरेटिव्ह कोलायटिस चे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ मोठ्या आतड्यांवर असेच परिणाम करते, तर क्रॉस पाचन तंत्राच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकते. तथापि क्रोन्स हा रोग बहुधा लहान आतड्यांच्या शेवटी आणि मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीस आढळून येतो.एकंदरीत आयडी हा आजार कसा होतो यावर पूर्ण निष्कर्ष अजूनही निघालेला नाही पण संशोधन तज्ञांच्या मते यासाठी अनुवंशिकता,  वातावरणातील बदल, आतड्यातील खराब जिवाणू व कमी प्रतिकारशक्ती हे घटक कारणीभूत आहेत. याबरोबरच खराब मानसिक वृत्ती ही तेव्हडीच कारणीभूत आहे म्हणजे जास्त ताण तणाव घेणारी व्यक्ती, लहानसहान गोष्टीवर चिडचिड करणारी व्यक्ती, खुप भावनिक व्यक्ती अशा व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

लक्षणांची तीव्रता सौम्य ते अत्यंत तीव्र असू शकते यात वारंवार रक्तस्त्राव होतो तसेच अतिसार होणे, गुदाशय आतून रक्तस्त्राव होणे, आव पडणे, पोट दुखी, ताप थकवा वजन कमी होणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. कधीकधी आयबीडी मुळे शरीरातील पचन प्रक्रियेच्या बाहेरील भागात जळजळ होऊ शकते ही दाह बहुतेक वेळा सांधे, डोळे, त्वचा आणि यकृत यावर दिसून येते. या आजाराची लक्षणे कमी होऊ शकतात किंवा अदृष्य होऊन शकतात आणि नंतर अचानक उद्भवू शकतात व त्यास उपचारांची आवश्यकता असते. यात काही लक्षणे खूप त्रासदायक असतात याकडे दुर्लक्ष केली जाऊ नये.

आयबीडी या आजाराचे निदान रुग्णाच्या मागील हिस्ट्री वरून व काही रक्त तपासण्या बरोबर इंडॉस्कॉपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी करून किंवा बायोप्सी द्वारे निदान करता येते.

आयबीच्या उपचाराच्या मुख्यतः दोन पद्धती आहेत.

·         जीवन शैलीतील बदल – यात सात्विक आहार घेणे.  चहा-कॉफी मद्य धूम्रपान  यासारख्या गोष्टी टाळणे. दिवसातून वारंवार पण थोडे थोडे जेवण करणे म्हणजे  पोटभर जेवण न करणे. तसेच योग्य मानसिक ते साठी तणावमुक्त जीवन व योग, ध्यान करणे. नियमित व्यायाम करणे.

·         रोगाच्या तीव्रतेनुसार औषधे वापरली जातात. कधीकधी रोगाच्या तीव्रतेनुसार स्टिरॉइड, इमीन्यूमोडेललेटर, बायोलॉजीस चा वापर करावा लागतो. लवकर आणि योग्य उपचारांचा बहुतेक रुग्ण निरोगी जीवन जगू शकतो.

आयबीडी असलेल्या रुग्णांमध्ये कोलन कर्करोगाचा धोका वाढतो जो कोलनवर परिणाम करतो.  रोगाचा दरम्यान विकसित होणार्‍या विकृती शोधण्यासाठी नियमित अंतराने कोलोनोस्कोपी ची आवश्यकता असते.

आयबीडी व कोविड-19

आयबीडीच्या रुग्णांनी सध्याच्या परिस्थितीत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे सुरू ठेवावीत जेणे करून आजार नियंत्रणात ठेवता येईल व जेणेकरून रुग्णांना भरती होण्याची गरज पडणार नाही.  शक्यतो डॉक्टरांशी टेलिकम्युनिकेशन द्वारे संपर्कात राहा आणि प्रवास टाळावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading