शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचेही ऑननलाईन शिक्षण सुरु ठेवा- शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांची परिपत्रकाद्वारे माहिती

पुणे : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात वानवडी भागातील व शहरातील इतर अन्य शाळांमध्ये २०२० व २०२१ वर्षाची संपूर्ण फी भरण्यास सक्ती करण्यात येत होती. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येत होते. त्यामुळे याविरोधात भारतीय जनता पार्टी पुणे ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे निवेदन देऊन आंदोलनही करण्यात आले. या मागणीला यश आले असून पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचेही आॅनलाईन शिक्षण सुरु ठेवण्याचे परिपत्रक जारी केले आहे. 

ओबीसी मोर्चा भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेश पिंगळे, पुणे शहर ओबीसी उपाध्यक्ष विशाल बाळासाहेब केदारी यांनी जिल्हाधिकारी व प्राथमिक-माध्यमिक शिक्षण अधिका-यांना दिनांक २ फेबुवारी २०२१ रोजी निवेदन दिले होते. विद्यार्थ्यांकडून ५०% टक्के पेक्षा कमी फी आकारण्यात यावी, अशी विनंतीही केली होती. निवेदन दिल्यानंतर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेवू, असे आश्वासन देण्यात आले. परंतु १४ मे २०२१ पर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे १७ मे रोजी माजी आमदार व ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
योगेश पिंगळे म्हणाले, शिक्षण अधिका-यांनी आमच्या मागणीची दखल घेत सर्व शाळेना परिपत्रक जारी केले आहे. तसेच सदर विषय राज्य मंत्रीमंडळाकडे देखील पाठवण्यात आला आहे. आॅनलाईन शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली आहे. त्यांनाच आॅनलाईन वर्गात प्रवेश मिळत असल्याचे आम्हाला दिसून आले. त्यामुळे आम्ही ही मागणी केली होती. 

विशाल बाळासाहेब केदारी म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे फी न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, याकरीता ही मागणी केली. त्याला यश आले असून मोर्चाचे पदाधिकारी शंतनू नारके, यशोधन आखाडे, ओंकार माळवदकर, अमोल पांडे, रोहन कोद्रे, बंडू कचरे यांनी याकरीता पाठपुरावा केला.

Leave a Reply

%d bloggers like this: