‘दगडूशेठ गणपती’ मंदिरात कोरोना संकट निवारणाकरीता विशेष याग

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोरोना संकट निवारणासाठी विशेष यागांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मृत्युंजय व धन्वंतरी महायाग मंगळवारी पार पडला. कोरोनाचे वैश्विक संकट दूर व्हावे, याकरिता मंदिरामध्ये या विविध यागांचे आयोजन करीत गणरायाचरणी प्रार्थना देखील करण्यात आली.  

वेदमूर्ती नटराज शास्त्री व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. सुरुवातीला महागणपती पूजा त्यानंतर महासंकल्प, पुण्यवाचनम्, स्थलशुद्धी, कलशस्थापना, सर्व देवता आवाहन, नवग्रह व नक्षत्र आवाहन, महा मृत्युंजय देवता आणि धन्वंतरी आवाहन, महा मृत्युंजय देवता आणि धन्वंतरी जप आणि होम-हवन करण्यात आले. आरतीने या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप झाला.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे, याकरीता हे याग करण्यात येत आहेत. दुस-या दिवशी उग्रनरसिंह व सुदर्शन महायाग होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी घराबाहेर न पडता घरबसल्या दर्शन घ्यावे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.comhttp://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: