सीए पांडुरंग लोखंडे यांना ‘जिद्द’ पुरस्कार

पुणे : प्रतिकूल परिस्थितीतून सी ए (सनदी लेखापाल) होऊन कार्यक्षेत्रात कामाचा आदर्श सर्वांसमोर ठेवणाऱ्या सी ए पांडुरंग लोखंडे यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी आणि संस्कार पब्लिक स्कुलचा ‘जिद्द’पुरस्कार जाहीर झाला आहे.

कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल आणि संस्कार पब्लिक स्कुलच्या मुख्याध्यापक सिद्धी मित्तल यांनी ही माहिती दिली.मूळचे मरकळ(आळंदी) येथील असलेले पांडुरंग लोखंडे हे मराठी माध्यमातून शिकून कोणताही क्लास न लावता चार्टर्ड अकाउंटंट झाले आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे कार्यरत आहेत.समाजातील आदर्श व्यक्तिमत्वे पुढे आणून सकारात्मकता वाढविण्यासाठी ‘जिद्द’पुरस्कार दिला जातो.सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.कोरोना साथीची परिस्थिती आटोक्यात आल्यावर त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: