पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांविषयी कृतज्ञतेची भावना!

प्रकाश पारखी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनावश्यक साहित्याचे केले वाटप

पुणे : पडद्यामागे राहून निरपेक्ष भावनेने रंगभूमीची सेवा करणार्‍या कलाकार-तंत्रज्ञांचा जीवनोपयोगी साहित्य भेट देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान केला नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी आणि निमित्त होते ते त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाचे!

प्रकाश पारखी  वयाची 70 वर्षे पूर्ण करून 71व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या पडद्यामागील सुमारे 40 कलाकार-तंत्रज्ञांना 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी पदरचे 70 हजार रुपये खर्ची घालून जीवनावश्यक साहित्याचे  वाटप केले. या वेळी बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा कार्यवाहअभिनेते दीपक रेगेसत्यजित दांडेकरअमोल जाधव यांची उपस्थिती होती. शहरातील विविध नाट्यगृहांमध्ये कार्यरत असलेल्या पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञांचा या वेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी बोलताना प्रकाश पारखी म्हणालेनाट्यसंस्कार कला अकादमीच्या माध्यमातून अनेक बालनाट्यांचे प्रयोग विविध रंगमंदिरात केले. व्यावसायीक बालरंभूमीवर प्रयोग सादर करण्याला 50 वर्षे होत आहेत. विविध प्रयोग करीत असताना पडद्यामागील कलाकारांचे मोलाचे सहकार्य लाभले. पण गेल्या वर्षापासून रंगभूमीचा पडदा उघडलेला नाहीकलाकार म्हणून मायबाप प्रेक्षकांची सेवा करता आलेली नाही. आयुष्यात निर्व्यसनी राहूनबचतीच्या माध्यमातून सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांवर आलेले हे संकट लवकरात लवकर दूर व्हावेअशी नटराज चरणी प्रार्थना आहे. प्रयोगादरम्यान पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांचा आज सन्मान करीत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: