गुणाकार म्हणजे पुन्हापुन्हा केलेली बेरीज, भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी :सुधाकर आगरकर

पुणे : ‘भास्कराचार्यांच्यालीलावती ग्रंथामध्ये सोपी उदाहरणे देवून गुणाकाराची,भागाकाराची ओळख करून दिली असून गुणाकारम्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज आणि भागाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेलीवजाबाकी होय  असे त्यांनी सांगितले आहे ‘,असे प्रतिपादन गणिताचे अभ्यासक डॉ सुधाकर आगरकर यांनी सांगितले .

‘भास्कराचार्यांच्या लीलावती ग्रंथावर ‘अंकनाद’ आयोजित झालेल्या वेबिनार मध्ये शनिवारी सायंकाळी त्यांनी हे प्रतिपादन केले .भास्कराचार्य यांनी गुणाकाराच्या पाच पद्धती सांगितल्या आहेत.रुपगुणरित,खंडगुणरीत,विभाग गुणरित,स्थानगुणरित,इष्टांकरित अशा यापाच पद्धती आहेत .
 भागाकार म्हणजे पुन्हापुन्हा केलेली वजाबाकी असून तशी वजाबाकी पुन्हा पुन्हा करण्याऐवजी भागाकार केलाजातो ‘,असे आगरकर यांनी सांगितले .  

‘अंकनाद ‘ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप कडून थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘ लिलावती ‘ या ग्रंथावर वर वेबिनार मालिकेचे आयोजन  करण्यात आले आहे.त्या अंतर्गत शनिवारी गुणाकार आणि भागाकाराचे विवेचन करण्यात आले .

प्राची साठे यांनी प्रास्ताविक केले ,आसावरी बापट यांनी भास्कराचार्यांच्या  श्लोकांचे गायन केले . ८ मे    रोजी सायंकाळी साडेपाच वाजता  हे पाचवे सत्र झाले .

९ मे रोजी रविवारी सकाळी ११ वाजता  सहावे सत्र होणार आहे .रविवारी वर्ग आणि वर्गमूळ संकल्पनेवर मार्गदर्शन केले जाणार आहे . वर्षभर हा वेबिनार उपक्रम  चालणार आहे. भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव  मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून  ‘ अंक नाद ‘ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती  मॅप एपिक कम्युनिकेशन्स् चे संचालक मंदार नामजोशी यांनी   दिली.आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा  रंजक पद्धतीने उलगडला गेला .

Leave a Reply

%d bloggers like this: