Saturday, June 20, 2026
Business

व्हीएन फायनान्सकडून स्थलांतरीत कामगार व वित्तीय अभावग्रस्तांसाठी ‘श्रमिक लोन’ आणि ‘रोजगार लोन’

मुंबई, -: आर्थिक अभावग्रस्त आणि बँकांच्या परिघाबाहेर असणाऱ्या लोकांना कर्ज/ पतपुरवठा करण्याचे देशाचे पंतप्रधान आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून, तंत्रज्ञानसमर्थ बँकेतर वित्तीय कंपनी व्हीएन फायनान्सने ‘श्रमिक लोन’ आणि ‘रोजगार लोन’ या विशेष योजनांची प्रस्तुती केली आहे. स्थलांतरीत कामगार आणि वित्तीय अभावग्रस्त छोटे व्यावसायिक स्त्री व पुरुषांसाठी असलेल्या छोट्या रकमेच्या या कर्ज योजनांचे २०२० सालच्या स्वातंत्र्यदिनी अनावरण केले जाणार आहे. कोविड-१९ च्या कहराने देशातील लाखो लोकांना संकटाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर २४X७ अहोरात्र अखंड सेवेसह, किमान दस्तऐवजांच्या माध्यमातून आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून संवाद साधून एका दिवसात कर्ज वितरणाने या लोकांना दिलासा देण्याचा व्हीएन फायनान्सचा दृष्टिकोन आहे.

ही कर्जे २५,००० रुपये इतक्या अल्प रकमेपासून सुरू होणारी आहेत. तातडीने वित्त साहाय्याची गरज असलेल्या लोकांनी कोणत्याही तारणाविना अथवा विद्यमान कोणतीही मालमत्ता नाही अशी मंडळी थेट (किंवा मध्यस्थांमार्फत) व्हीएन फायनान्सशी संपर्क साधून आपली पत आणि परतफेड योग्यतेची क्षमता सिद्ध करू शकतात. ठरविलेली स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना सर्वोत्तम शर्तींवर निधी मिळविता येईल.

व्हीएन फायनान्सकडून सुरक्षित कर्जे जसे मालमत्ता तारण कर्ज, सुर्वण आभूषणे तारण ठेऊन कर्ज आणि माल साठा (इन्व्हेंटरी) तारण कर्ज देखील प्रस्तुत केले गेले आहे. प्रत्येक धंदा-व्यापाराला निरंतर खेळते भांडवल हवे असते आणि व्यवसाय जसा वाढत जातो तसे ते आणखीच गरजेचे ठरते. व्हीएन फायनान्सचा व्यावसायिक संघ हा धंदा-व्यापाराच्या प्रत्येक गरजेला नेमकेपणाने जाणते आणि दुकानात/गोदामात पडून असलेल्या वस्तू आणि माल साठ्याच्या बदल्यात कर्ज पुरवठा केला जातो. छोट्या दुकानदाराला केवळ शिल्लक माल साठ्याची यादी आणि त्याचे मूल्य सादर करावे लागते. 

व्हीएन फायनान्सचे संचालक आणि संस्थापक मोहित कक्कड म्हणाले, “सुलभ आणि गतिमान वित्तपुरवठा करून गरजू लोकांना त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत करून समाजात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्या लोकांना वाट पाहाणे परवडणारे नाही आणि पारंपरिक कर्जदात्यांच्या जटील आणि वेळकाढू प्रक्रियांची पूर्तता करणे अथवा त्या समजून घेणे ज्यांना शक्य नाही, अशा विभागांवर आम्ही लक्ष केंद्रीत करीत आहोत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वितरण यंत्रणा विकसित करून कर्ज वितरणाची पद्धती सुलभ, गतिमान आणि व्यापक करण्यासाठी आम्ही अथक प्रयत्नरत आहोत. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगर (एमएमआर) क्षेत्रात आक्रमकपणे विस्तारण्याचे आणि टप्प्याटप्प्याने भारतभर विस्तारण्याचे आमचे नियोजन आहे.”

व्हीएन फायनान्सकडून बँकिंग मध्यस्थ, स्वयंसहाय्य बचत गट (एसएचजी), गैरसरकारी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आणि व्यापार प्रतिनिधींचे जाळे विकसित केले जात असून, ते स्थलांतरित मजूर, बँकांकडून दुर्लक्षित आणि आर्थिकदृष्ट्या वंचित स्त्री-पुरुषांपर्यत पोहचून त्यांना कर्ज वितरणास मदत करतील. हा लक्ष्यित ग्राहकांचा उच्च शिक्षित नसल्याने, व्हीएन फायनान्स त्यांना आणि वित्तीय मध्यस्थांसाठी सर्वात सोप्या व सुलभ मार्गाने मदत करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.

भारताला खरोखरच आर्थिक सर्वसमावेशकता साधायची असेल, तर व्हीएन फायनान्ससारख्या बँकेतर वित्तीय कंपन्यांची भूमिका महत्त्वाची आहे, अशी मोहित कक्कड यांची ठाम धारणा आहे. आर्थिक साक्षरता प्रसारासह, किमान तारण घेऊन, प्रक्रियात्मक वेळ अल्प राखून आणि पतविषयक कोणतीही पूर्वपिठिका नसलेल्या, औपचारिक ओळखीचा दाखल्यांचा आणि चक्रीय उत्पन्न स्त्रोतांचा अभाव तसेच किमान कागदी कामकाजातून कर्ज वितरणात लक्षणीय भूमिका बजावणे आवश्यक आहे. 

केंद्र सरकार आणि नियामकांनी अनेक प्रकारचे उपाय हाती घेताना, बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाऊंट (बीएसबीडीए), लीड बँकिंग स्कीम (एलबीएस), प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) सारख्या योजनांसह, भिम, यूपीआय, डीबीटीच्या माध्यमातून वित्तीय समावेशकतेला चालना दिली आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक समावेशकतेचे राष्ट्रीय डावपेच २०१९-२४ च्या माध्यमातून, मार्च २०२२ पर्यंत पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री (सार्वजनिक पत नोंद) पूर्णपणे कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अधिकृत वित्तीय संस्थांना त्याच्या साहाय्याने गरजूंपुढे पतप्रस्ताव ठेवता येतील. गुगल पे, वॉलमार्टच्या मालकीच्या फोनपे आणि लवकरच सुरू होणाऱ्या व्हॉट्सअँप पे यांच्या माध्यमातूनही बँकेतर वित्तीय कंपन्यांना उपयुक्त माहिती मिळविता येऊ शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading