fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने उत्सवांच्या काळात “आरोग्यत्सोव”द्वारे स्वच्छतेचा जागर!

माय अर्थ फांउडेशन आणि पतित पावन संघटनेच्यावतीने आरोग्यत्सोवाचे आयोजन…

पुणे – पुणे हे विद्येचे माहेरघर व उत्सवप्रिय शहर आहे, तसेच स्वच्छतेचे शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी शहरात उत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी निर्माल्य, नैवेद्य विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्याने “माझा कचरा माझी जबाबदारी” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून काम करीत असलेल्या माय अर्थ फांउडेशन या संस्थेद्वारे “आरोग्यत्सोवाचे” आयोजन करण्यात आले आहे.

पुणे शहरातील २५० हुन अधिक गणेशमंडळांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेशोत्सव ते नवरात्र उत्सव पर्यन्त हा उपक्रम सुरु राहणार आहे. निर्माल्य – हार – नैवद्य यांचे संकलन करून पुणे मनपा च्या सहकार्याने सेंद्रिय पद्धतीने खतनिर्मितीची संकप्ल्पना तसेच  १० टन टाकाऊ प्लास्टिक संकलन करण्याचा उपक्रम आणि रिसायकल प्लास्टिक डस्ट बिन चे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली आहे. यावेळी पर्यावरणतज्ञ नितीन देशपांडे, कचरा व्यवस्थापनतज्ञ ललित राठी, पतित पावन संघटनेचे कसबा विभाग प्रमुख योगेश वाडेकर आणि यादव पुजारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाने आणि पुणे महागरपालिकेच्या सहकार्याने माय अर्थ फांउडेशन आणि पतित पावन संघटनेच्यावतीने आरोग्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्यत्सोवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळापासून होणार आहे. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे क्रांतिकारक भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे यांचे काम मोलाचे होते. यांच्याच कार्याच्या प्रेरणेतून स्वच्छतेची क्रांती करण्याचा माय अर्थ फांउडेशन संस्थेचा मानस आहे.

पर्यावरणतज्ञ व माय अर्थ फांउडेशनचे विश्वस्त नितीन देशपांडे म्हणाले कि, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नागरिकांडून जमा केलेले हार, निर्माल्य, नैवैद्य अशा गोष्टी आमच्या संस्थेकडे जमा कराव्यात, अशा गोष्टींपासून आम्ही त्याचे सेंद्रिय पद्धतीने खतनिर्मिती करुन पुन्हा अशा मंडळांकडे देऊ, हे खत त्यांनी नागरिकांना झाडांसाठीचा नैवैद्य म्हणून मंडळांकडून प्रसाद देण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबर शहरातील सोसायटी तसेच नागरिकांकडील निर्माल्य,हार, नैवेद्य हे माय अर्थ संस्थेकडून देण्यात आलेल्या निर्माल्य कलश किंवा संकलन बागेमध्ये जास्तीत जास्त जमा करून शहर स्वच्छ ठेवण्यास मदत करण्याचे आवाहन माय अर्थ फांउडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. संस्थेशी संपर्क साधण्यासाठी  ९८५०८८९००६ / ९२७०१७७६७७ / ९९२२९२७९५९ / ८९९९६७८९५७  हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading