राम मंदिर स्थापनेसाठी लढा दिलेल्या सैनिकांचा विजय
पुणे, दि. ६ – राम मंदिर स्थापनेच्या लढ्यासाठी संपूर्ण देशातून घराघरातून तरुण पुढे आले होते. या संघर्षात अनेकांनी आपले प्राण देखील गमावले. या लढ्याच्यावेळी कारसेवक कोठारी बंधू यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा विजय म्हणजे राम मंदिर स्थापनेसाठी लढा दिलेल्या या सैनिकांचा आहे. हा विजय एका उत्तम लढ्याबरोबर संयमाचा देखील आहे, असे मत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी व्यक्त केले.

डॉ. अजय दुधाणे मित्र परिवार व गुरूदत्त सेवा मंडळाच्यावतीने शिरोळे रस्ता येथील गुरुदत्त मंदिरात भगवान अयोध्या येथील श्रीराम मंदिर भुमीपूजन निमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी योगेश बाचल,डॉ. अजय दुधाणे उपस्थित होते. कारसेवक दत्तात्रय सोनार, नितीन कुंवर, मोहन चव्हाण, दत्तात्रय साळवी, बाळू विधाते, मिलिंद पवार, संतोष पंडीत, शाम खेंगरे, राजेश मुळूक, भूषण मोरे, राजाभाऊ शिंदे आदीं कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मानार्थींना प्रभु रामचंद्राची प्रतिमा भेट देण्यात आली.
तसेच मंदिरात दिपोत्सव करून आणि परिसरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन विशाल धुमाळ, संजय वाळजे, गणेश खेंगरे, योगेश मोरे, जितेंद्र तांबीटकर, अभिजीत मोरे, सागर पांचाळ यांनी केले. यावेळी कारसेवक नितीन कुंवर यांनी अनुभव सांगितले. गुरुदत्त संस्थेच्या वतीने विशाल धुमाळ यांनी आभार मानले.
