७ ऑगस्ट पासून पुण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्स

पुणे, दि. ४ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (आझम कॅम्पस )आणि इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ आर्किटेक्ट्स (पुणे चॅप्टर ) यांच्या वतीने ७ आणि ८ ऑगस्ट 2020 रोजी पुण्यात दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे . ही कॉन्फरन्स ऑनलाईन स्वरूपात गुगल मीट माध्यमातून होणार असून देशभरातून संशोधक ,प्राध्यापक ,विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ‘ इम्पिरिकल थिअरीज इन आर्किटेक्चर,प्लानिंग एंड कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट ‘ हा या परिषदेचा विषय आहे. अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या प्राचार्य डॉ लीना देबनाथ यांनी ही माहिती दिली. http://www.allanaarchitecture.org या संकेतस्थळावर अधिक माहिती घेता येईल.
