Wednesday, June 10, 2026
MAHARASHTRA

UPSC Result – राज्यातून अभिषेक सराफ प्रथम तर नेहा भोसले दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रातील ९० हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, 4 :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण  829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून अभिषेक सराफ हा प्रथम तर नेहा भोसले दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानुक्रमानुसार  हे दोघे आठव्या आणि पंधराव्या स्थानावर आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2019 च्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानुक्रमे 8 व्या स्थानावर अभिषेक सराफ, नेहा भोसले 15 व्या स्थानावर,मंदार पत्की 22 व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी 44 व्या स्थानावर, योगेश पाटील 63 व्या स्थानावर, विशाल नरवाडे 91 व्या स्थानावर, आहेत. दिव्यांगामधून राज्यातील जयंत मंकले हे 143 व्या स्थानावर आहेत.

जयंत मंकलेंची अंधत्वावर मात : केंद्रीय लोकसेवा आयोगात 143 क्रमांक

पुण्याचा जयंत मंकले या दिव्यांग उमेदवाराने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 च्या परीक्षेत 143 वा क्रमांक मिळविला आहे. या आधी जयंतने 2018 मध्ये ही लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती, त्यावेळी त्याचा क्रमांक 937 होता. यावेळी पुन्हा प्रयत्न करीत 143 वा क्रमांक मिळविला.

महाराष्ट्रातील महिला उमेदवारांनीही मारली बाजी

यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 12 महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना देशभरातील गुणांनुक्रमानुसार 15 वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. याशिवाय नेहा दिवाकर देसाई (137), अश्विनी तानाजी वाकडे (200), गौरी पुजारी (275), नेहा किरडक (383), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), अंकिता अरविंद वाकेकर (547), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), प्रियंका कांबळे (670), प्रज्ञा खंडारे (719), अनन्या किर्ती (736).

या परीक्षेत यश मिळविणाऱ्या  महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये यांचा समावेश आहे. –

अभिषेक सराफ (8), नेहा प्रकाश भोसले (15), मंदार जयवंतराव पत्की (22), आशुतोष कुलकर्णी  (44), दिपक करवा (48),  योगेश अशोकराव पाटील (63), विशाल तेजराव नरवडे (91), मयुर खंडेलवाल (106), राहूल लक्ष्मण चव्हाण (109), विनोद पाटील (132), कुलदिप जंगम (135), नेहा दिवाकर देसाई (137), जयवंत किशोर मनकाळे (143), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (151), शेख मोहमद झेब झाकीर (153), अश्विनी तानाजी वाकडे (200), सागर भारत मिसाळ (204), माधव विठ्ठलराव गित्ते (210), कुणाल मोतीराम चव्हाण (211), सचिन हिरेमठ (213), सुमित महाजन (214), श्रेणिक लोढा (221), अविनाश शिंदे (226), शंकर गिरी (230), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), आयुष खरे (267), गौरी पुजारी (275), गजराज बच्छावत (277), शंतनु अत्रे (281), प्रसाद शिंदे (287), रजनिश पाटिदार (307), आकाश अग्ले (313), मंदार देशपांडे (334), रजत उभयकर (378), आदित्य काकडे (382), नेहा किरडक (383), निमिश पाटील (389), महेश गिते (399), अभिषेक शिवहरे (414), कांतीलाल सुभाष पाटील (418), अमित कुमावत (423), अविनाश जगधवर (433), परमानंद प्रविण दराडे (439), स्वप्नील पवार (448), ऋषिकेश जयसिंग देसाई (481), नकुल राजेंद्र देशमुख (489), शुभ्रमण्य भालचंद्र केळकर (497), डॉ.प्रणोती संजय संकपाल (501), सुमित कैलास जगताप (507), दिपक धनखेर (520), प्रसन्न लोढा (524), नवनाथ शिवाजी माने (527), प्रफुल्ल देसाई (532), वैभव हिरवे (541), अंकिता अरविंद वाकेकर (547), विजयसिंहराव साहेबराव गिते (550), समिर प्रकाश खोडे (551), सुरेश कैलासराव शिंदे (574), अभिनव प्रविण इंगोळे (624), अजय गणपती कुंभार (630), स्वप्नील जगन्नाथ पवार (635), अभिषेक दिलीप दुधाळ (637), पुनम प्रकाशराव ठाकरे (641), अशित कांबळे (651), करूण गरड (656), प्रियंका कांबळे (670), ऋषिकेश देशमुख (688), सौरभ व्हटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकटे (710), प्रज्ञा खंडारे (719), साकेत धवने (727), निखिल दुबे (733), राजीव मेश्राम (735), अनन्या किर्ती (736), शशांक माने (743), निखील कांबळे (744), सुमित रामटेके (748), शुभम भैसारे (749), निलेश गायकवाड (752), कुणाल उत्तम शिरोटे (765), वैभव वाघमारे (771), अश्विन गोलपकर (773), विधित्या नायक (780), किशोर सुत्रधार (784), सरगम शिंदे (785), सर्वेश सोनवाणी (787), अजिंक्य विद्यागर (789), सत्यजित यादव (801), समिर महाजन (810), सुनिल शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दिक्षित (827).  

यापैकी यशस्वी झालेल्या 66 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading