उद्यापासून पुण्यात सर्व दुकाने उघडण्यास परवानगी; सम – विषम तारखेची अट काढली
पुणे, दि. 4 – मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व दुकाने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सम आणि विषम तारखेची अट काढून टाकण्यात आली आहे. सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत दुकाने खुली राहतील व्यापारी संघटनांकडून सातत्याने ही मागणी केली जात होती.
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मार्च महीन्यापासून लॉकडाऊन सुरू होता. जुन महीन्यात या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली गेली होती. अनलॉक ची प्रक्रीया सुरू झाल्यानंतरही दुकाने सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने काही अटी घातल्या होत्या. रस्त्यावरील दुकाने सम – विषम तारखेनुसार सुरू ठेवण्याची सुट देण्यात आली होती. परंतु, या अटीमुळे ग्राहकांचा गोंधळ होत आहे, व्यावसायिकांसमोर आणखी अडचणी निर्माण होत आहे असा दावा व्यापारी संघटनांकडून केला जात होता.
