Monday, June 15, 2026
MAHARASHTRA

हे तर गलिच्छ राजकारण पण मी संयम बाळगून आहे.- आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 4 -अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात विरोधी पक्षाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांनी मौन सोडलं आहे.

कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजला आहे महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे बहुदा महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खूपते त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तीशा माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंब यावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे, मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही सिनेसृष्टी म्हणजे, बॉलीवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहे, हा काही गुन्हा नाही सुशांत सिंग राजपूत चा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे ,मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवन्याचा प्रयत्न करीत आहे मी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेलि तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही फालतु आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे याप्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांना द्यायला हवी पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील , याप्रश्नी मी आजही संयमाने वागत आहे अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणीही राहू नये असे आदित्य ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading