लीला पुनावाला फाउंडेशन आणि एचएसबीसी टेक्नॉलॉजी इंडियाची भागीदारी
पुणे आणि हैदराबाद मधील २०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यीनींना सहायता
पुणे, दि. ४ – एचएसबीसी टेक्नॉलॉजी इंडिया (एचटीआय) आणि लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) यांनी आर्थिकदृष्ट्या आव्हानित पार्श्वभूमी असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यीनींना उच्च शिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून २०० मुलींना मदत केली जाईल. ज्यात पुण्यात नर्सिंग आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमच्या १०० मुली (महाराष्ट्र राज्य) आणि हैदराबाद (तेलंगण राज्य) अभियांत्रिकी अभ्यासक्रमच्या १०० मुलींना शिष्यवृत्ती आणि रोजगार कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.

पुण्यातील लीला पुनावाला फाऊंडेशनने एचएसबीसी टेक्नॉलॉजी इंडियाच्या (एचटीआय) पाठिंब्याने विस्तीर्ण राष्ट्रीय पोहोच गाठत महाराष्ट्रातून बाहेर कार्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी लीला पुनावाला (पद्मश्री पुरस्कार विजेत्या, १९८९) अध्यक्ष -लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ) म्हणाल्या, “मुलींचे शिक्षण आणि सशक्तीकरण हे लीला पुनावाला फाउंडेशनचे मुख्य उदिष्ट आहे. एचएसबीसी टेक्नॉलॉजी इंडियासारखा भागीदार असणे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. शैक्षणिक दृष्ट्या उज्ज्वल परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व कौशल्य निर्मिती कार्यक्रमांच्या माध्यमातून सक्षम बनविण्याच्या एलपीएफच्या दृष्टीकोनाचे समर्थन करणारी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. याव्यतिरिक्त एचटीआयच्या कर्मचारी स्वयंसेवकांच्या पुढाकारांमुळे या मुलींमध्ये आत्मविश्वास आणि रोजगार कौशल्य वाढतील. ”
एचएसबीसी टेक्नॉलजी इंडियाचे प्रमुख बालसुब्रमण्यन गणेश म्हणाले, “ एचएसबीसीचा हा प्रयत्न रोजगार आणि आर्थिक क्षमता विकासाच्या लक्ष साध्य करने आहे, ज्याचा हेतू समाजातील वंचित तरुणींना आज आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी सक्षम बनविणे आहे. या ४ वर्षांच्या भागीदारीतून आम्ही आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या इच्छुक युवतींना प्रशिक्षण आणि अत्यंत कुशल रोजगाराच्या संधी उपलब्ध करूण देण्यासाठी प्रयत्नशील राहु. या मुलींना आर्थीकदृष्या स्वावलंबी बनवुन भविष्यासाठी सक्षम बनविणे हा आमचा उद्देश्य आहे ”
एलपीएफच्या अध्यक्षा लीला पुनावाला आणि एचटीआयचे सेंटर ऑपरेशन्सचे प्रमुख गिरीश बिदानी यांनी दामिनी खैरे (कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी लीड एचटीआय) आणि एलपीएफच्या प्रीती खरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, सीईओ)
यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
