व्यवसाय क्षेत्रातील भविष्यावर भाष्य करण्यासाठी नामांकित व्यवसायी एकत्र
इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री तर्फे आयोजन
पुणे, दि. ३ – इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (आयएफसीसीआय) ने बीएनपी परिबास अँड रोडल एण्ड पार्टनर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात पहिल्यांदाच भारतीय आणि फ्रेंच व्यावसायिक नेत्यांसह वच्युअल लीडरशीप टॉक आयोजित केला आहे. या वच्युअल टॉक मध्ये प्रमुख भारतीय आणि फ्रेंच व्यावसायिक नेत्यांची प्रास्ताविक बैठक गुरुवार, ६ ऑगस्ट २०२० रोजी गुरवारी ४ ते ५.३० दरम्यान होणार आहे.

या परिसंवादात बोलताना उद्योग जगतातील मोठ उद्योग व्यवसायी जसे की अयमार डी. लिडेकर्क ब्यूफर्ट, सीईओ बीएनपी परिबास इंडिया शाखांचे अध्यक्ष, फ़र्हाड फोर्ब्स-को-चेअरमन- फोर्ब्स मार्शल, अश्विन यार्डी सीईओ- कॅपेजेमिनी इंडिया, गौरी किर्लोस्कर, नॉन – एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर, किर्लोस्कर ऑईल इंजिन लि. आणि अमित जैन, डायरेक्टर-लॉरियल इंडिया. या परस्पर संवादी व्हर्च्युअल चर्चेचा हेतू भारतीय व फ्रेंच संघटनांना एकत्र करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोवीड १९ चा काय परिणाम होतो, भारतातील व्यवसायांन समोर येणारी आव्हाने, नवीन संधी आणि आर्थिक प्रगती यावर त्यांचे विचार समजून घेणे आहे. हे सत्र कठोर आव्हानांवर विविध व्यवसायातील सीईओं कडून मार्गाविषयी अंतर्दृष्टी देखील देईल.
आयएफसीसीआय पुणेचे अध्यक्ष रवीन मीरचंदानी आणि कार्यकारी अध्यक्ष अॅडोर पॉवरट्रॉन यांनी या गोष्टीची माहिती दिली की आता कोरोना लॉकडाऊनच्या परिणामाविषयी बोलणे थांबविण्याची आणि त्याऐवजी उदयाला आलेल्या नव्या जगाची तयारी करण्याची वेळ आली आहे. 2021 मध्ये वित्त, सल्ला, उत्पादन आणि ग्राहक वस्तूंचे क्षेत्र कसे असेल याविषयी चर्चा करण्याची गरज आहे.
हे वेबिनार ऐकण्यासाठी येथे लॉग इन करा: https://www.ifcci.org.in/events/upcoming-events.html.
