fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENT

सुशांत सिंह राजपूत च्या बहिणीने मागितली पंतप्रधान मोदींकडे मदत

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. बॉलीवूडमधील अनेकांची चौकशी करून झाल्यानंतर सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात तक्रार दाखल केल्याने सगळ्यांनीच भुवया उंचावल्या आहेत. त्यातच या प्रकरणात मुंबई पोलीस योग्य तपास करत नसून सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता, आता सुशांतच्या बहिणीने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.

सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने ‘मी सुशांत सिंह राजपूतची बहिण आहे आणि तुम्ही या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्याल अशी मी अपेक्षा करते’ असे म्हटले असून ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.

तसेच तिने या ट्विटमध्ये ‘नमस्कार सर, माझ्या मनात कुठे तरी असे वाटते की तुम्ही सत्याच्या बाजूने आहात. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. ज्यावेळी माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणी गॉडफादर नव्हता आणि आताही नाही. या प्रकरणाकडे तातडीने लक्ष द्यावे आणि या प्रकरणातील पुराव्यांसोबत कोणतीही छेडछाड होणार नाही अशी मी विनंती करते या आशयाची पोस्ट तिने केली आहे.

यापूर्वी इन्स्टाग्रामवर देवदेवतांचा फोटो पोस्ट करत श्वेताने सर्वांना सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. ‘सर्वजण एकीने खंबीरपणे उभे राहुयात आणि सत्याची साथ देऊयात’, अशी पोस्ट श्वेताने लिहिली होती. रियाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड व अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनेसुद्धा सोशल मीडियावर ‘सत्याचा विजय होतो’, अशी पोस्ट लिहिली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading