fbpx

आता 31 मार्च 2023 पर्यंत घेऊ शकता ‘या’ पेन्शन योजनेचा फायदा

नवी दिल्ली – वृद्धापकाळासाठी निवृत्तीवेतन हा एक चांगला आधार आहे. हे लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान वय वंदना योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) सुरू केली होती. या योजनेंतर्गत निश्चित दराप्रमाणे निवृत्तीवेतन दिले जाते. यासाठी ग्राहक भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीला एकरकमी रक्कम देऊन दरमहा निश्चित पेन्शन मिळवू शकतात. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याचा कालावधी 31 मार्च 2020 ते 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान वय वंदना योजनेची पात्रता

पंतप्रधान वय वंदना योजना म्हणजेच PMVVY मध्ये किमान 60 वर्षांचे ज्येष्ठ नागरिकच गुंतवणूक करु शकतात. या पेन्शन योजनेत गुंतवणूकीसाठी कोणतीही जास्तीत जास्त वयोमर्यादा नाही. ग्राहक या योजनेत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

पंतप्रधान वय वंदना योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला LIC ( भारतीय जीवन विमा महामंडळ) च्या कार्यालयात संपर्क साधावा लागेल. अशी अपेक्षा आहे की आपण या योजनेचा पूर्वीप्रमाणे काही दिवसात ऑनलाइन फायदा घेण्यास सक्षम असाल. 31 मार्च 2020 च्या शेवटच्या तारखेमुळे आपण याक्षणी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. आपण एलआयसी कार्यालयातून या योजनेचा फॉर्म घ्यावा आणि त्यासोबत आपली आवश्यक कागदपत्रे जोडावी आणि कोणत्याही कार्यालयात जाऊन जमा करावी.

PMVVY योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतात.
– पत्ता पुरावा प्रत
– पॅन कार्डची प्रत
– चेकची प्रत किंवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत

किती मिळते पेन्शन?

या योजनेंतर्गत आपण किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 10,000 रुपयांपर्यंत पेन्शन घेऊ शकता. जर ग्राहकांना दरमहा एक हजार रुपये पेन्शन हवी असेल तर त्यांना 1,50,000 रुपये जमा करावे लागतील. त्याचबरोबर त्यांना जर दरमहा 10,000 रुपये पेन्शन घ्यायची असेल तर त्यांना यासाठी 15,00,000 रुपये जमा करावे लागतील. ही गणना 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या योजनेच्या आधारे केली गेली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: