fbpx

रिअल हिरोंनी तयार केलं कोरोना जनजागृतीसाठी “मिलकर लढ़ना है हमे” हे गीत . . .

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, तो रोखण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी, शेतकरी असे अनेक

Read more

प्लॅनेट मराठीची सहा नव्या सिनेमांच्या निर्मितीची घोषणा

प्लॅनेट मराठीची पहिलीवहिली निर्मिती असलेला ‘एबी आणि सीडी’ हा धम्माल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवसापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सिनेमा

Read more

स्वप्नांचा नक्षीदार प्रवास उलगडणारा ‘गोष्ट एका पैठणीची” चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!!

प्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात.  काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी.. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर

Read more

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ मालिकेची आगळी वेगळी व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्स

लॉकडाऊनमध्ये सुरू होणारी ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. मालिकेची व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स शुक्रवार, दिनांक 15 मेला पार पडली. घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी बनवण्यात आलेल्या या मालिकेची प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घरी बसूनच झाली. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात कोणी घरा बाहेर पडू शकत नसल्याने सर्वच जण खिडकीतून जग बघत आहेत त्याचप्रमाणे या व्हर्चुअल खिडक्यांमधून आज सर्व पत्रकार, कलाकार आणि मालिकेच्या इतर टीमची भेट झाली.   लॉकडाऊनच्या काळात सुरू होणारी ही पहिली नवी मालिका आहे आणि सोनी मराठी वहिनीनं उचललेलं हे अतिशय धाडसी पाऊल असल्याने सर्वत्रच त्याच कौतुक केलं जात आहे. या मालिकेत एकूण 16 कलाकार असून ते आपापल्या घरूनच या मालिकेचं चित्रीकरण करणार आहेत. सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले, लेखिका विभावरी देशपांडे आणि कलाकार लीना भागवत, मंगेश कदम, समीर चौघुले आणि थेट लंडनवरून सखी गोखले व सुव्रत जोशी या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते. मालिकेचं चित्रीकरण घरून करण्याचे अनुभव ते करताना उदभवणाऱ्या समस्या आणि त्यासाठी केलेले जुगाड अशा सर्वच विषयांवर या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. पत्रकारांकडूनसुद्धा या आगळ्या वेगळ्या मालिकेचं आणि झालेल्या पहिल्या वाहिल्या व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्सचं कौतुक झालं.  त्याचप्रमाणे प्रेस कॉन्फरन्समध्ये या मालिकेचे तीनही प्रोमोज दाखवण्यात आले आणि मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्येचं एक्सक्लुसिव्ह रिलीज करण्यात आलं. कलाविश्वात अशी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स पहिल्यांदाच घेण्यात आली आणि घरून शूट होणाऱ्या मालिकेप्रमाणेच या मालिकेची व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्ससुद्धा चर्चेचा विषय ठरली. पाहायला विसरू नका लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी बनवलेली ही नवी विनोदी मालिका ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ १८ मेपासून सोमवार-मंगळवार रात्री १० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Read more
%d bloggers like this: