Tuesday, October 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये – – गोपाळदादा तिवारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये – – गोपाळदादा तिवारी
एमपीएससी परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला कॉँग्रेसचा पाठिंबा ..!
आंदोलना पुर्वीच् सरकारचे, पोलीसांचे मार्फत विद्यार्थ्यांचे खच्चीकरण व बदनामीचे प्रयत्न.. काँग्रेस चा आरोप
पुणे दि.  14 जुलै (प्रतिनिधी) –
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ची परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न लाखो विद्यार्थी पाहत असतात.
त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतात, लाखो रुपये खर्च करतात. अचानक एमपीएससीने परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खाजगी कंपन्यांचे सहाय्याने अनेक शिफ्ट मध्ये होऊ पहाणाऱ्या ऑनलाइन स्पर्धा परीक्षा या पुर्णतः सदोष असून विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून असंख्य विद्यार्थी नुकसान ग्रस्त व सदोष पद्धतीस विरोध करत असल्याचे समोर आले आहे.
आज पर्यंतच्या ॲाफलाईन प्ध्दतीने होणाऱ्या परीक्षा पध्दतीत बदल न करता
परीक्षा व्हाव्यात या रास्त व न्याय्य मागणीसाठी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते
गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली स्वायत्तता जोपासत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका घ्यावी अन्यथा काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही वारिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा यांनी दिला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अडीच महिन्यानंतर घेण्यात येणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाचे सरचिटणीस साहेबराव क्षीरसागर , एमपीएससीचे विद्यार्थी सचिन गायकवाड, सूजय वसईवर, राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य भोला वांजळे इ उपस्थित होते.
गोपाळदादा  तिवारी म्हणाले
एमपीएससीने अचानकपणे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय अतार्किक व चुकीचा आहे
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यानंतर गुण देण्यासाठी वापरण्यात येणारी नॉर्मलायझेशन ची पद्धत देखील चुकीची आहे. इतर राज्यांमध्ये स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतात हा एमपीएससी’चा दावा चुकीचा असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन परीक्षा पूर्णतः खाजगी कंत्राटदार संस्थेच्या सहयोगाने घेण्यात येते व त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कोणतीही पायाभूत सुविधा नाही असे असताना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यास वारंवार पेपर फुटीचा धोका पुढे आल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे, असे असताना आयोग हा हट्ट का करते आहे असा सवाल ही त्यांनी केला.
‘परीक्षा पध्दतीच्या’ रास्त व न्याय्य मागणी करीता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संविधानात्मक अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देऊन त्यांची बदनामी व गळचेपी करण्यात येत आहे.

एन एस यु आय चे सरचिटणीस साहेबराव क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्र मध्ये दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहेत. ॲानलाईन’च्या अनेक शिफ्ट मध्ये परीक्षा देण्याच्या प्रक्रियेत
विद्यार्थ्यांना वेळोवेळी भरमसाठ फी देखील भरावी लागणार असल्याने ही अन्यायकारक बाब असून विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एमपीएससी ने आपली स्वायत्तता जपून विद्यार्थ्यांचा हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी साहेबराव क्षीरसागर यांनी यावेळी केली.

एमपीएससी विद्यार्थी सचिन गायकवाड म्हणाले, एमपीएससी’चा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय हा ६ महिने पुर्व सुचना देणे आवश्यक असताना.. केवळ १ महिन्याची पुर्व सुचना देऊन निर्णय घेणे हेच मुळात चुकीचे असुन, पुरेशा प्रमाणात लॅपटॉप व इंटरनेट च्या सुविधेचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे ही सचिन गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading