यंदाचा वैष्णव पुरस्कार डॉ. विजय महाराज जगताप यांना जाहीर
पुणे : ह. भ .प विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जे व्ही इंगळे व त्यांच्या पत्नी मेघा इंगळे यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा ‘वैष्णव पुरस्कार’ यावर्षी प्रख्यात वारकरी कीर्तनकार व ज्येष्ठ व्यवस्थापनतज्ञ ह.भ.प. विजय महराज जगताप यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती इंगळे कुटुंबीयांनी कळविली आहे. रुपये २१ हजार रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २३ जुलै २०२६, रोजी कोथरूड मधील एम.ई.एस. बाल शिक्षण मंदिर सभागृहात आयोजित करण्यात येणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात सदर पुरस्कार जगताप यांना प्रदान करण्यात येईल. याआधी पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, विदुषी देवकी पंडित, श्रीनिवास जोशी, पं. हेमंत पेंडसे, प्रसिद्ध कथक नर्तक गुरु डॉ नंदकिशोर कपोते आणि गायक, संगीतकार डॉ. भरत बलवल्ली व पं. रघुनाथ खंडाळकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
