Wednesday, October 14, 2026
Latest NewsPUNE

प्रभात तरुण मित्र मंडळातर्फे संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालख्यांचे जल्लोषात स्वागत

पुणे : प्रतिनिधी

आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे डेक्कन जिमखाना येथील गुडलक चौकात प्रभात तरुण मित्र मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी पालखीसोबत आलेल्या वारकरी बंधू-भगिनींसाठी मंडळाच्या वतीने राजगिरा लाडू, चिक्की, बिस्किटे, बटाटा चिवडा आदी खाद्यपदार्थांसह पावसापासून संरक्षणासाठी रेनकोट (प्लास्टिक इरले) यांचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमात मंडळाचे कार्याध्यक्ष अपूर्व सोनटक्के, अध्यक्ष बाळासाहेब गिराम, उत्सव प्रमुख सिद्धार्थ भोंडे, पियुष भळगट, प्रिया रानडे, किमया ढेकणे, सुवर्णा ऋषी, वृंदा बाम, सुनीता जेऊर, प्रिती फडके, वृंदा गिराम, वैशाली जोगळेकर, योगेश जोगळेकर, समर ठकार, प्रणव बाम, मिलिंद टकले, पुष्कर लिमये, सुषमा कार्ले, पूर्वा गोडबोले आणि प्राजक्ता जोगळेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले होते.

या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या सेवेसोबतच अध्यात्मिक आणि सकारात्मक उर्जेचा अनुभव मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रभात तरुण मित्र मंडळ सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून, ही संकल्पना आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि नगरसेवक सुनील पांडे यांच्या प्रेरणेतून साकारण्यात आली.

या प्रसंगी भाजपच्या नगरसेविका निवेदिता एकबोटे, नगरसेवक अपूर्व खाडे तसेच सरचिटणीस अर्चना सोनावणे यांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading