Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

संत तुकाराम महाराज पालखीचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले सारथ्य  

पुणे : प्रतिनिधी

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आज पहाटे पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केले.  उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आषाढी वारीनिमित्त  निवडुंगा विठोबा मंदिर, भवानी पेठ येथे जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेतले, याप्रसंगी  पहाटे सहा वाजता उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली. यानंतर जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेत त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच भवानी पेठ ते पुलगेट दरम्यान पालखी रथाचे सारथ्य वाडेकर यांनी केले

यावेळी देहू संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे महाराज यांच्या शुभहस्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार पालखीचे स्वारस्य (मानाचा सन्मान) उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक विशाल धनवडे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, ट्रस्टचे पदाधिकारी, वारकरी, भाविक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमहापौर यांनी  संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज पालखीचे पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ येथे दर्शन घेतले यावेळेस  संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर  वाडेकर यांचा सन्मान केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading