सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी?
मोहिनी मालिकेमध्ये सध्या घडत असलेल्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. RK आणि त्याच्या कुटुंबातील वाद आता एका नव्या आणि टोकाच्या वळणावर आला आहे. RK ने आपल्या वडिलांशी केलेल्या गैरवर्तनामुळे संतापलेल्या मोहिनीने थेट त्याच्या कानशिलात लगावल्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे. या अनपेक्षित धक्क्यातून सगळे सावरत नाहीत तोच, RK च्या आयुष्यातील भूतकाळ म्हणजेच ‘दीपा’ची एंट्री झाली आहे. दीपाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री विधीशा म्हस्कर (Vidhisha Mhaskar) साकारत आहे. दीपाच्या येण्याने RK च्या आयुष्यात कुठलं वादळ येणार? यावरून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत… RK च्या प्रेमाचा दीपाने विश्वासघात केला आणि त्यामुळे RK ने कधीच कोणत्याही मुलीला त्याच्या जवळ येऊ दिले नाही. पण मोहिनी आली आणि सगळं बदल. RK ला स्वतःत्व सापडलं. असं म्हणताताना तो दिसणार आहे. आता हीच ठरणार का RK – मोहिनीच्या नव्या नात्याची सुरुवात ? पण हे सगळं घडत असताना आता सुपरस्टार RK जेल मध्ये जाणार आहे. यांच्यामागे नक्की काय कारण आहे ? नेमकं काय घडलं ? आणि RK गजाआड जाण्याचं कारण मोहिनी ठरणार का? जाणून घेण्यासाठी पहा मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी दररोज संध्या. ७.३५ वा. आपली कलर्स मराठीवर.
सध्या सेटवर आणि RK च्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. दीपाने RK ची बंद पडलेली फिल्म स्वतः मुख्य अभिनेत्री बनून पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सुरुवातीला या गोष्टीला तीव्र नकार देणारा RK, परिस्थितीच्या दबावाखाली अखेर दीपासोबत काम करायला तयार तर होतो, पण त्याच्या मनात आता केवळ सूडाची भावना आहे. फिल्मचे शूटिंग सुरू झाले असले तरी RK दीपा मुळे परत एकदा दारूच्या अमलाखाली जातो…. व्यसन आणि त्याचा विचित्र स्वभाव सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच RK ने मोहिनीला आपली पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून कामावर ठेवले असून, दीपाला तिची जागा दाखवण्यासाठी आणि तिला चिडवण्यासाठी तो मुंदेदम मोहिनीचा वापर करत आहे. यामुळे केवळ दीपाच नाही, तर मोहिनीशी लग्न करण्याची मनशा असलेला मुकुंदही रागाने आणि जळफळाटाने वेडापिसा झाला आहे.
या सगळ्या त्रिकोणी संघर्षामुळे आणि RK च्या बेजबाबदार वागण्यामुळे सेटवरील वातावरण कमालीचे तापले आहे. एकीकडे दीपाला धडा शिकवण्याचा आरकेचा प्रयत्न, तर दुसरीकडे मोहिनी बद्दल मुकुंदच्या मनात निर्माण झालेला अविश्वास यामुळे नातेसंबंधांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली आहे. RK च्या हाताबाहेर चाललेली परिस्थिती आणि त्याचा अतिरेकी राग येत्या भागात एका अत्यंत गंभीर आणि अनपेक्षित संकटाला आमंत्रण देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या सगळ्या वादळात मोहिनी स्वतःला कशी सावरणार ? RK चा सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार? हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरेल.
पहा, ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ दररोज संध्या. 7:35 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
