Thursday, July 9, 2026
BusinessLatest News

गुंतवणूकीची सुवर्णसंधी! ॲक्सिस म्युच्युअल फंडाच्या वतीने ‘ॲक्सिस निफ्टी५० इक्वल वेट्स इंडेक्स फंड’ योजनेची घोषणा 

मुंबई  : देशातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या ॲक्सिस म्युच्युअल फंडाने आपल्या नव्या फंड ऑफरची घोषणा केली आहे. या नवीन योजनेचे नाव ‘ॲक्सिस निफ्टी५० इक्वल वेट्स इंडेक्स फंड’ असे आहे. ही एक ओपन-इंडेक्स योजना आहे. ही योजना निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्सचा मागोवा घेईल. या माध्यमातून गुंतवणूकदारांना निफ्टी ५० निर्देशांकातील आघाडीच्या ब्लू-चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येईल. सर्व कंपन्यांमध्ये समान प्रमाणात निधी वाटप केले जाईल. या खास धोरणामुळे गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी उत्तम आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ मिळेल. या नवा फंड गुंतवणूकदारांसाठी आज ३ जुलै २०२६ रोजी सुरु होत असून, १७ जुलै रोजी बंद होईल.

ॲक्सिस निफ्टी५० इक्वल वेट्स इंडेक्स फंड

निफ्टी ५० इक्वल वेट टीआरआयच्या परताव्याचा मागोवा घेणे, हा ॲक्सिस निफ्टी५० इक्वल वेट्स इंडेक्स फंडचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेत निर्देशांकातील सर्व ५० कंपन्यांमध्ये समान प्रमाणात गुंतवणूक केली जाते. प्रत्येक तिमाहीत पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन केले जाते. यामुळे प्रत्येक कंपनीतील गुंतवणूकीचे प्रमाण समान राहते. बाजारातील चढ-उतारांमुळे केवळ काही मोजक्या कंपन्यांमध्ये जास्त गुंतवणूकीची शक्यता कमी होते. यामुळे गुंतवणूकदारांना सर्व ५० कंपन्यांमध्ये संतुलित पद्धतीने गुंतवणूकीचा लाभ मिळतो.

हा पारदर्शक आणि नियमांवर आधारित दृष्टीकोन गुंतवणूकीमधील वैयक्तिक पूर्वग्रह किंवा अनिश्चितता दूर करतो. पोर्टफोलिओचे व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केले जाते, याबाबत गुंतवूकदारांना स्पष्ट माहिती मिळते. गुंतवणूकीचे निर्णय वैयक्तिक मतांवर किंवा अंदाजावर अवलंबून राहत नाहीत. पूर्वनिश्चित नियमांच्या आधारे पोर्टफोलिओचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे गुंतवणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सातत्यता राखली जाते.

ॲक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार यांनी या नव्या ऑफरची माहिती दिली. ते म्हणाले,” ॲक्सिस निफ्टी५० इक्वल वेट्स इंडेक्स फंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वेगळा पर्याय देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे गुंतवणूकदारांना संतुलित आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने भारतातील आघाडीच्या ब्लू-चिप कंपन्यांमध्ये सहभागी होता येईल. ॲक्सिस एएमसीमध्ये पॅसिव्ह गुंतवणूकीच्या गरजा पूर्ण करु शकतील, अशा अष्टपैलू आणि मजबूत योजनांची निर्मिती करण्यावर आमचा भर आहे. गुंतवणूकदार आता त्यांच्या मुख्य पोर्टफोलिओला कार्यक्षम आणि विविधीकृत पॅसिव्ह गुंतवणूक पर्यायी जोड देण्यास प्राधान्य देत आहेत. अशा प्रकारच्या गुंतवणूक धोरणांमुळे दीर्घकालीन कालावधीत योग्य मूल्य आणि स्थिर परतावा मिळण्यास मदत होईल, असा आमचा विश्वास आहे.”

निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्सचे फायदे

अलीकडच्या काळात इक्वल वेट आधारित गुंतवणूक धोरणांमुले गुंतवणूकदारांचा कल लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. २०१९-२० मध्ये या प्रकारच्या पॅसिव्ह योजनांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता सुमारे १०० कोटी रुपये होती. २०२५-२६ मध्ये ही मालमत्ता जवळपास १०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्समध्ये सर्व ५० कंपन्यांना समान महत्त्व दिले गेले आहे. या सर्व कंपन्यांमध्ये समान गुंतवणूक होते. तसेच, काही मोजक्या मोठ्या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होतो. यामुळे गुंतवणूकदारांना निफ्टी ५० मधील सर्व कंपन्यांमध्ये व्यापक आणि संतुलित पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी मिळते. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार, समान जोखीम असूनही निफ्टी ५० इक्वल वेट टीआरआयने वेगवेगळ्या कालावधीत निफ्टी ५० टीआरआयपेक्षा सरस कामगिरी केली आहे.

या योजनेच्या व्यवस्थानाची जबाबदारी नंदिक मल्लिक आणि रोहित गौतम यांच्याकडून सांभाळली जाईल. या योजनेमध्ये एनएफओ कालावधील आणि त्यानंतरही किमान १०० रूपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading