Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात ‘आम्र महोत्सव’

पुणे : वैशाख पौर्णिमेनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात आम्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरातील गाभारा आणि श्री दत्त महाराजांसमोर १ हजार आंब्यांची आरास करण्यात आली.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरात आम्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री दत्त महाराजांची माध्यान्ह आरती महाराष्ट्र भाजपा सरचिटणीस राजेश पांडे आणि लोकप्रिय सिने कलाकार प्रविण तरडे यांचे हस्ते झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर सर्व भाविकांना आमरसाचा प्रसाद देखील देण्यात आला.

यावेळी देऊळबंद – २ या श्री स्वामी समर्थांच्या उपदेशाने शेतकरी आत्महत्या रोखण्याचा आशय असणाऱ्या नवीन चित्रपटाची प्रवीण तरडे यांनी माहिती दिली. या चित्रपटाचे उत्पन्न आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या अपत्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली. वैशाख पोर्णिमेनिमित्त सकाळी दत्त भक्त अंजली व शरद बांदल यांचे हस्ते श्री दत्त याग संपन्न झाला. तसेच आम्र महोत्सवाला देखील बांदल कुटुंबीयांनी सहकार्य केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading