पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियोजन बैठक संपन्न
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त आवश्यक नियोजनाबाबत पुणे महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मिरवणूक मार्गाचे वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था, अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य पथक व कार्डियाक अॅम्ब्युलन्सची नियुक्ती, विद्युत रोषणाई, अग्निशमन व्यवस्था, महापालिका सुरक्षा, मोबाईल टॉयलेट, मंडप, स्टेज, टेबल-खुर्ची तसेच मदत कक्ष उभारणी यांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय सम्राट अशोक स्तंभाची देखभाल व दुरुस्ती, तसेच दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी आणि डी.पी. रोड, औंध येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याचे नूतनीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांच्या नियोजनानुसार ३० मार्च रोजी विश्रांतवाडी येथे आणि ३१ मार्च रोजी पुणे स्टेशन परिसरातील बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे पुढील बैठका आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकीत महापौर मा. सौ. मंजुषा नागपूरे व उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांनी प्रशासनाला सर्व नियोजन काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस मा. ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), मा.हिम्मत जाधव,डी.सी.पी.ट्राफिक,पुणे,मा.निलेश आल्हाट,सभासद,पुणे महानगरपालिका, मा.संतोष पांढरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (बंडगार्डन,पुणे), मा. श्रीमती संगीता देसाडला,कार्यकारी अभियंता ,भवन विभाग,मा.धनंजय पिंगळे, ट्राफिक विभाग, मा.श्रीमती आशा राऊत,उपायुक्त ,सुरक्षा विभाग,मा. माधव जगताप, उपायुक्त झोन क्र.०१ ,मा.बिपीन शिंदे, मा.डॉ.सुनिल अंधारे,सहायक आरोग्य अधिकारी, मा.रवी पवार ,उपायुक्त,पुणे, मा.सोमनाथ बनकर,उपायुक्त ,अतिक्रमण विभाग,मा.अविनाश सकपाल,उपायुक्त घनकचरा विभाग, मा.श्रीमती प्रज्ञा पवार, सहायक महापालिका आयुक्त, पुणे,मुख्य अभियंता, भवन विभाग, मा.वसुंधरा बारवे, उपायुक्त शिक्षण विभाग, मा.नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग, मा. हांडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मा.श्रीमती संगीता जाधव,पोलिस निरीक्षक येरवडा वाहतूक, मा.श्रीमती निशिगंधा शिंगे,येरवडा वाहतूक विभाग, मा.संदीप माढाले, फरासखाना विभाग, मा. कुणाल धुमाळ, मा.रमेश शेळके, मा.राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, मा.प्रमोद उंडे,कार्यकारी अभियंता,विद्युत विभाग, मा.सुनिल यादव, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, डॉ. आशिक घोरपडे,सहायक महापलिका आयुक्त, मा. विजय भिकारे, सहायक विभागीय अधिकारी,अग्निशामक विभाग उपस्थित होते.
