Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

‘दांत’ शरीर आरोग्याचे प्रवेशद्वार असून शरीर आरोग्यात दातांचे स्थान महत्वाचे…! ⁃ काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी      

पुणे  :  ‘शरीराच्या आरोग्यात, दातांचे आरोग्य महत्वाचे असुन दांत हे शरीर आरोग्याचे प्रवेशद्वार असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले. नवी पेठ तालीम येथील “श्री गणेश मित्र मंडळ सार्व. गणेशोत्सव”  यांनी आयोजित ‘विनामुल्य दंत तपासणी व उपचार’ उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

एम ए रंगुनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स, पुणे यांचे सहकार्याने सदरचे ‘दंत चिकीत्सा शिबीर’ आयेजित केले होते.
दंत चिकीत्सा उपक्रमाचा शुभारंभ श्री गणेश मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री वसंतराव गवारे यांचे हस्ते झाले.

समारोप प्रसंगी,  काँग्रेस नेते गोपाळदादा पुढे म्हणाले की, ‘सार्वजनिक गणेशोत्सवात – सार्वजनिक आरोग्य सेवा’ परीसरातील गरजू नागरीकांना उपलब्ध करून देणे, हा स्तुत्य व अभिनंदनीय सामाजिक उपक्रम असुन सामाजिक बांधिलकीचे प्रतिक आहे. धकाघकीच्या जीवनात आरोग्याच्या रक्षणा करीता दांतांची निगा राखणे ही ‘एकंदर आरोग्य जपणारी चांगली सवय’ असल्याचे सांगीतले. आर्थिक विवंचना वा खर्च करण्यास टाळाटाळ या मध्ये अडकलेल्या आबाल – वृध्द नागरीकांसाठी असे उपक्रम वरदान ठरतात अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

एम ए रंगुनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्स’चे डॉ. उत्कर्षा देशपांडे, डॉ.उमेर शेख, डॉ.असिफाली मुलाणी, डॉ.अदनान बागवान, डॉ.मोरेश्वर पवार, निलोफर पटेल इ नी तपासणी केली व गरजेनुसार उपचार दिले. दंत – चिकीत्सा शिबीरात सु ९० नागरीकांनी लाभ घेतला.

शिबीराचे निमंत्रक, काँग्रेस’चे प्रभाग अध्यक्ष व मंडळाचे कार्याधक्ष शेखर पवार यांनी आभार प्रदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष सागर गोळे सह आशिष शिंदे, आयुष गोळे, समर्थ पवार, अनिकेत काळे इ नी “दंत चिकीत्सा शिबीराचे यशस्वी संयोजन करण्यात” विशेष परीश्रम घेतले. शहर काँग्रेसचे श्री अविनाश अडसूळ, गणेश ठोंबरे इ सह परीसरातील नागरीक – कार्यकर्ते यांचे ही भरीव सहकार्य लाभले..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading