Tuesday, April 21, 2026
Latest NewsPUNE

मराठा उद्योजक असोसिएशनच्या बिझनेस एक्स्पोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट

 

पुणे  : मराठा उद्योगजक असोसिएशनच्या वतीने आयोजित बिझनेस एक्स्पोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. मराठा समाजातील युवकांना उद्योग क्षेत्रात सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी एक्स्पोमधील विविध स्टॉलना भेट देत उत्पादन व निर्मिती क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर, स्टार्टअप्सच्या कल्पना तसेच बाजारपेठेतील संधी यांचा त्यांनी आढावा घेतला. उद्योजकांनी सादर केलेल्या नवकल्पनांचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
एक्स्पोला उद्योजकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी निर्माण होत असलेल्या सकारात्मक वातावरणाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. उद्योगस्नेही धोरणे, गुंतवणुकीस पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधांना दिलेले प्राधान्य यामुळे महाराष्ट्र राज्य उद्योग गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजातील युवकांनी नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे बनावे, हा काळाचा संदेश असल्याचे सांगून कौशल्य विकास, उद्योगासाठी आवश्यक भांडवल व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सारथी संस्थेच्या माध्यमातून युवकांना शिक्षण, प्रशिक्षण व उद्योग मार्गदर्शन दिले जात असून औद्योगिक व सेवा क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उद्योजक संघटनांशी समन्वय ठेवून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading