Tuesday, March 3, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALPUNETOP NEWS

विरोधीपक्षनेते राहुल गांधी विषयी निशिकांत दुबेंचे वक्तव्य ‘संविधानीक अज्ञान व बाल-बुध्दी’ दर्शवणारे..  ⁃काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे   – भाजप खा. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रातील मराठी भाषिक व भूमिपुत्रांच्या विषयी काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्य केले त्यावर महाराष्ट्रातील रणरागिणींनी त्यांना संसद भवनात घेराव घालून सुनावले देखील होते. मात्र आपल्या बालीश व नाठाळ हरकतीं पासुन न सुघारलेले निशिकांत दुबे यांनी संसदेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांचे विषयी काढ़लेले ऊदगार, वक्तव्य व कथित प्रस्ताव हा संविधानिक अज्ञान, असुया, द्वेष व बालबुध्दी प्रदर्शीत करणारे असल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, देशात मोदी सरकारचा २०१४ ते २४ चा कार्यकाळ व प्रत्यक्ष अनुभव लक्षात घेऊनच देशातील जनतेने भाजप’ला अपेक्षे प्रमाणे ४०० पार जागा दिल्या नाहीत, तर उलटपक्षी ईडी, सत्ताधारी भाजपा ने सीबीआय, प्राप्तिकर विभाग व निवडणूक आयोग व पक्षफोडी इ तंत्रे यांचे सहाय्य घेऊनही भाजप’च्या संसदेतील सु ३५% जागा कमी झाल्या व मा राहुल गांधी व खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या १०० % जागा वाढून ५२ च्या १०२ जागा झाल्याने, देशातील जनतेनेच् देशाच्या – संसदेत काँग्रेस-इंडीया आघाडीच्या माधमातून, मा राहुल गांधी ना मजबूत विरोधी पक्ष नेता केले आहे, याचे किमान भान बालबुध्दी खासदार निशिकांत दुबे यांनी ठेवावयास हवे होते.
सत्य बाहेर आल्यास सत्ताधाऱ्यांची पोलखोल होईल याचे भान लोकसभा सभापतींना होते, म्हणूनच त्यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधींना पुरावे मांडण्यापासुन रोखले, मात्र मोदी – शहांच्या पुढे चाटुकारिता करणाऱ्या व देशाच्या स्वातंत्र्य संग्रामा’प्रती अनास्था बाळगणाऱ्यांना याचे भान कसे असणार(?) असा मिश्किल व उपहासात्मक सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading