Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

यंदाच्या महाशिवरात्रीला कलर्स मराठीवर शिवस्वरूपाचे भव्य दर्शन घडणार

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच ‘न भूतो न भविष्यति’ अशी शिवतत्त्वाची अनुभूती प्रेक्षकांना मिळणार आहे. महाशिवरात्रीच्या मंगल पर्वानिमित्त कलर्स मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे दिव्य शिवतत्त्वाची अनुभूती देणारे ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकांचे दोन भव्य विशेष भाग.
तुळजाई आणि यमाई यांचे करविण्या मर्मबंधन, या महाशिवरात्रीला महादेव घडवणार ब्रह्मांड दर्शन आणि स्वामींच्या हृदयी उजळली ज्योत शिवतेजाची, प्रकटली बारा ज्योतिर्लिंगे, देती प्रचिती शिवस्वरूपाची अशी भव्यदिव्य दृश्य अनुभूती असलेले हे भाग यंदाची महाशिवरात्र प्रेक्षकांसाठी संस्मरणीय करणार आहेत.

आई तुळजाभवानी या मालिकेचा महाशिवरात्री विशेष भाग येत्या रविवारी १५ फेब्रुवारीला संध्याकाळी ०७ वाजता रंगणार असून या भागात ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या आध्यात्मिक सिद्धांताची उकल होणार असून महादेवांचे भव्य ब्रह्मांडरूप अनुभवता येईल. या गोष्टीला देवी यमाई आणि आई तुळजाभवानी यांच्या कथेचा असलेला संदर्भही या महाएपिसोडमध्ये उलगडणार आहे.
‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत सोमवारी १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ०७:३० वाजता २६ मिनिटांचा महाशिवरात्री विशेष भाग रंगणार असून, स्वामी चरित्रातील महत्त्वाची व्यक्तिरेखा असलेल्या भाऊसाहेब जहागीरदारांच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण घटनेत शिवतांडव स्तोत्राच्या गजरात स्वामींच्या हृदयातून एकापाठोपाठ एक बारा ज्योतिर्लिंग प्रकट होणार आहेत. त्याचे प्रयोजन आणि शिवस्वरूपाची अनुभूती एक आगळावेगळा दिव्य अनुभव प्रेक्षकांना देईल.

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच शिवस्वरूपाचे भव्य दर्शन आणि त्यामागील आध्यात्मिक संकेतांची उकल पाहायला मिळणार असल्यामुळे नक्की पाहा ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ महाशिवरात्री विशेष भाग, आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading