Monday, May 25, 2026
BusinessLatest NewsPUNE

डाबर च्यवनप्राशतर्फे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक विद्यालयात विशेष सत्राचे आयोजन

 

पुणे : हिवाळा कोणालाच फारसा आवडत नाही; आणि त्यातच खोकला, सर्दी व श्वसनविकार यांसारखे आजार झाल्यास हिवाळ्याची मजाच निघून जाते. तापमानात घट व हवामानातील बदल यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे हे आजार होतात. अशा परिस्थितीत, हजारो वर्षांपासून प्रसिद्ध असलेले व कोट्यवधी लोकांनी यशस्वीपणे वापरलेले आयुर्वेदिक उत्पादन च्यवनप्राश मोठा दिलासा देते. डाबर च्यवनप्राशचे सेवन केल्याने खोकला व सर्दी सारख्या हंगामी आजारांपासून संरक्षण मिळतेच, शिवाय शरीरातील विविध अवयवांचे कार्य सुधारून शरीर अधिक सक्षम बनते.

डाबर च्यवनप्राश या डाबरच्या आघाडीच्या आरोग्यसेवा ब्रँडने देशभरातील वंचित मुलांचे संरक्षण करण्यासाठी एका व्यापक जनजागृती उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत, डाबर च्यवनप्राशने नामांकित डॉक्टरांच्या सहकार्याने प्रतिकार शक्तीविषयक सत्रांचे आयोजन करून बदलते हवामान, सामान्य जीवाणू व विषाणूंशी लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्तीची गरज मुलांना समजावून सांगितली.

पुण्यातील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक विद्यालयात ३०० हून अधिक मुलांसाठी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या विशेष सत्रातून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक विद्यालयातील नितीन वाणी, सुनीता जाधव, प्रदीप गवळी, स्वाती लोखरे, संजीवनी सोनार, सुरेखा डफळ, कल्याणी गाडे, सौमया शेख व रेखा फेंगसे तसेच डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार उपस्थित होते. हिवाळ्यात होणाऱ्या आजारांशी लढण्यासाठी मुलांमध्ये जनजागृती करणे हा या सत्राचा मुख्य उद्देश होता. यासोबतच मुलांना स्वच्छतेच्या सवयी आणि पौष्टिक आहाराद्वारे प्रतिकारशक्ती कशी वाढवावी याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना डाबर इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग हेड – हेल्थ सप्लिमेंट्स, श्री. अमित गर्ग म्हणाले, “गेल्या १०० वर्षांहून अधिक काळापासून डाबर च्यवनप्राश प्रत्येक भारतीयाची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. या मुलांना च्यवनप्राश देण्यासोबतच दरवर्षी अनेक जीव घेणाऱ्या थंडीच्या लाटेबाबतही आम्ही चिंतित आहोत. वंचित मुलांचे संरक्षण व त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

डॉ. सुमित म्हणाले, “हवामान बदलाच्या चक्रामुळे तापमानात अचानक बदल होतात, ज्यामुळे खोकला, सर्दी, फ्लू, श्वसनाचे आजार व प्रतिकारशक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवतात. खोकला, सर्दी व फ्लूसारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या संसर्गांशी लढण्यासाठी डाबर च्यवनप्राश प्रभावी उपाय आहे.”

या मोहिमेंतर्गत, आग्रा, वाराणसी, गोरखपूर, लखनऊ, उदयपूर, जयपूर, भुवनेश्वर, कोलकाता, सिलिगुडी, पाटणा, गया, इंदूर, रायपूर, पुणे, औरंगाबाद, रांची, बेंगळुरू, मुंबई, नाशिक व नागपूर अशा २२ शहरांमध्ये डाबर च्यवनप्राश उपलब्ध असून, ग्वाल्हेर व भोपाळ येथील आघाडीच्या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

च्यवनप्राश ही सुमारे ३००० वर्षांपूर्वीची प्रसिद्ध आयुर्वेदिक कृती असून, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व खोकला-सर्दीसारख्या दैनंदिन संसर्गांशी लढण्यासाठी वापरली जाते. डाबर च्यवनप्राश मधील मुख्य घटक आवळा असून, तो प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. याशिवाय गुळवेल, पिंपळी, शतावरी, विदारीकंद, हरितकी, कंटकारी, काकरशिंगी, भूम्यामलकी, वासाका, पुष्करमूळ, पृष्ठपर्णी, शालपर्णी आदी घटक श्वसनमार्गातील संसर्ग व अॅलर्जी कमी करण्यास मदत करतात. या सर्व औषधी घटकांचे संतुलित मिश्रण म्हणजेच डाबर च्यवनप्राश असून, हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती प्रदान करते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading