Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथानक अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक टप्प्यावर पोहोचत आहे. या कालावधीत स्वामी समर्थ अचानक एका रात्री स्थानावरून नजरेआड होतात आणि सेवेकऱ्यांना ते स्मशानभूमीत दिसतात. सुंदरा हादरून त्यांना प्रश्न विचारते, तेव्हा स्वामी “वेळ आली आहे… आता आम्हाला उंच जायचं आहे” असे सूचक शब्द बोलतात. हे शब्द स्वामींच्या महानिर्वाणाचे संकेत आहेत का, या विचाराने सेवेकरी अस्वस्थ होतात आणि स्वामींना नजरेआड होऊ न देण्याचा निर्णय घेतात. मात्र स्वामी आपल्या मर्जीनुसार वागतात आणि “हमने हमारा नया ठिकाना बना लिया है” असे सांगून सगळ्यांची उत्सुकता आणखी वाढवतात.
आगामी भागात स्वामी समर्थ जमिनीवर झोपण्याचा निर्णय घेतात, भक्तांच्या यादी तयार करतात आणि अचानक प्रकटलेल्या शिवलिंगाशी संवाद साधतात.यामुळे ही कथा गूढ थरारक वळण घेते. सुंदरा, कपिला आणि सेवेकऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होतो. पुण्यातील शिवभक्त नंदराम गवंडी यांची कथा, त्यांचा आजार, स्वामींचा अंगारा आणि पुढे घडणारी लार्जर-दॅन-लाईफ लीला कथानकाला आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाते. स्वामी मल्लिकार्जुन रूपात दर्शन देतात तर दुसरीकडे स्वामी गोडाधोडाचा त्याग जाहीर करतात. या साऱ्या घडामोडींमधून महानिर्वाणाकडे जाण्याचे गूढ संकेत स्वामी देत आहेत — जे उलगडण्याचे आव्हान आता प्रेक्षकांसमोर आहे..
तेव्हा अनुभवा ही दिव्य स्वामीलीला ‘जय जय स्वामी समर्थ’ दररोज रात्री ७.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading