टाटा एआयए लाइफकडून प्रीमियम ऑफसेट आणि गॅरंटीड इन्कम पर्यायांसह दीर्घकालीन बचत अधिक सुलभ
मुंबई : भविष्यासाठी बचत करणे ही बहुतांश लोकांची इच्छा असते—मात्र दीर्घकालीन बचत योजनेत सातत्य राखणे अनेकदा कठीण वाटते. वाढते घरगुती खर्च, बदलत्या गरजा आणि दरवर्षी प्रीमियम भरण्याचा ताण यामुळे दीर्घकालीन आर्थिक बांधिलकी सांभाळणे आव्हानात्मक ठरते. बचत अधिक सोपी आणि परवडणारी व्हावी, यासाठी टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने आपल्या दीर्घकालीन बचत योजनेत फॉर्च्युन गॅरंटी सुप्रीम* अंतर्गत सुधारणा करत, आर्थिक ताण कमी करणारी आणि हमी परतावा देणारी वैशिष्ट्ये सादर केली आहेत.
‘प्रीमियम ऑफसेट’द्वारे बचतीची जबाबदारी सामायिक
या सुधारणांचे केंद्रबिंदू म्हणजे टाटा एआयएचे वैशिष्ट्यपूर्ण ‘प्रीमियम ऑफसेट’ फीचर. या सुविधेनुसार, 12 वर्षांच्या प्रीमियम भरण्याच्या कालावधीत ग्राहकांना फक्त पहिल्या 6 वर्षांसाठीच प्रीमियम भरावा लागतो, तर उर्वरित 6 प्रीमियम टाटा एआयएकडून मिळणाऱ्या उत्पन्न लाभातून ऑफसेट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या रचनेमुळे संपूर्ण कालावधीत प्रीमियम भरण्याचा ताण न घेता ग्राहक दीर्घकाळ गुंतवणूक टिकवू शकतात. स्वतःच्या खिशातून जाणारा खर्च कमी झाल्याने शिस्तबद्ध बचतीचा अडथळा कमी होतो—विशेषतः आजच्या वातावरणात, जिथे वाढते खर्च आणि कर दीर्घकालीन आर्थिक निर्णय अधिक कठीण बनवतात.
या सुधारण्यांबाबत प्रतिक्रिया देताना, टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचे उत्पादन प्रमुख, मार्केटिंग, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अँड बिझनेस मिड ऑफिस सुजीत कोठारे म्हणाले, “अनेक ग्राहकांना दीर्घकालीन बचत करायची इच्छा असते, मात्र वाढते खर्च आणि करांच्या पार्श्वभूमीवर ही बांधिलकी जड आणि टिकवून ठेवण्यास कठीण वाटते. फॉर्च्युन गॅरंटी सुप्रीम अधिक मजबूत करताना, आम्ही ही अनुभवप्रक्रिया बदलत असून बचतीची जबाबदारी ग्राहकांसोबत सामायिक करत आहोत. प्रीमियम ऑफसेट ही संकल्पना आणि हमी उत्पन्न पर्याय यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध बचत अधिक सोपी, अंदाजे आणि दीर्घकाळ टिकणारी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
फॉर्च्युन गॅरंटी सुप्रीम अंतर्गत ग्राहकांना गॅरंटीड इन्कम आणि इतर हमी लाभ मिळवण्याचा पर्याय उपलब्ध असून, पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार 6% पेक्षा अधिक इंटरनल रेट ऑफ रिटर्न (IRR) देण्याची क्षमता या योजनेत आहे. ‘पॉवर ऑफ 6’ म्हणून ओळखली जाणारी ही सुविधा भविष्यात निश्चितता आणि नियमित उत्पन्न शोधणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आली आहे—मग ते निवृत्तीनंतरच्या गरजा असोत, कुटुंबाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांची पूर्तता असो, किंवा आयुष्याच्या पुढील टप्प्यातील आर्थिक स्थैर्य असो.
‘पॉवर ऑफ 6’ हा व्हेरिएंट ग्राहकांना 6% इंटरनल रेट ऑफ रिटर्नची हमी देत, कंपनीचा दीर्घकालीन आणि विश्वासार्ह आर्थिक उपायांवरील फोकस अधिक मजबूत करतो. मुलांचे शिक्षण, निवृत्ती नियोजन आणि उत्पन्न सुरक्षितता यांसारख्या आयुष्याच्या महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी योजना आखणाऱ्या व्यक्तींना लक्षात घेऊन हा व्हेरिएंट तयार करण्यात आला आहे. खात्रीशीर परतावा आणि जीवन विमा संरक्षण यांचे संयोजन करून, आर्थिक नियोजनात अधिक आत्मविश्वास देण्याचा उद्देश यात आहे.
दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी केले डिझाइन
फॉर्च्युन गॅरंटी सुप्रीम ही वैयक्तिक, नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग जीवन विमा बचत योजना असून, पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत खात्रीशीर लाभांसोबत जीवन विमा संरक्षण देते. त्यामुळे अनपेक्षित परिस्थितीतही आर्थिक सातत्य आणि संरक्षण सुनिश्चित होते. पात्र प्रीमियमवर इन्कम टॅक्स कायद्याच्या च्या कलम 80C अंतर्गत करसवलतीचा लाभ उपलब्ध राहतो, तर परिपक्वता (Maturity) आणि मृत्यू लाभ कलम 10(10D) अंतर्गत करमुक्त असतात—हे सर्व लागू असलेल्या कर कायद्यांच्या अधीन राहून.
या सुधारित वैशिष्ट्यांमुळे टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सचा उद्देश ग्राहकांच्या साशंकताआणि खर्चाशी संबंधित चिंता दूर करत, त्यांना अधिक सोप्या, आत्मविश्वासपूर्ण आणि स्पष्टतेसह दीर्घकालीन बचतीसाठी बांधील राहण्यास सक्षम करणे हा आहे.
