Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुणे सोलापूर महामार्गावर अपघात; अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाणारे पाच जण ठार

सोलापूर :  पुणे सोलापूर महामार्ग मोहोळ नजीक देवडी गावाजवळ शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, एक जण जखमी झाला आहे हे सर्व भाविक नवी मुंबई येथील रहिवासी असून ते अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असताना वाटेतच हा दुर्दैवी अपघात घडला.

एमएच ४६ झेड 45 36 या ईरटीका कार मधून पनवेल मधील भाविक अक्कलकोटला निघाले होते मोहन नजीक देवडी फाट्याजवळ मोटार गाडीचा ताबा सुटल्याने भरधाव वेगातील गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्यामुळे अपघात घडला यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे मोटार कार मधील सर्व प्रवासी हे एकमेकांचे मित्र होते या अपघातात माला माला रवी साळवे वय 60 राहणार पंचशील नगर झोपडपट्टी सेक्टर नंबर 18 पनवेल अर्चना तुकाराम भंडारे वय 47 सेक्टर 7 कांदा कॉलनी पनवेल विशाल नरेंद्र भोसले वय 41 आरबीआय एम एस ओ रूम नंबर 8 रेल्वे कॉलनी पनवेल अमर पाटील खारघर आनंद माळी असे पाच जण मरण पावले असून ज्योती जयदास टाकले राहणार सेक्टर 7 पनवेल रायगड या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात एवढा भीषण होता यात ईरटीका गाडीचा चक्काचूर झाला आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading