Monday, June 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

कॉंग्रेसला मत म्हणजे शांततेला मत – सतेज पाटील

पुणे  – सध्या देशभर लोकशाही धोक्यात आहे .तुम्ही अशा माणसाला निवडून द्या ज्यांच्या घरी किवा ऑफिसला तुम्हाला जाता येईल .त्यामुळे कॉंग्रेसला मत म्हणजे शांततेला मत असे जाहीर आव्हाहन आज माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले .

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखिल भारतीय काँग्रेस पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे प्रभाग २२ काशेवाडी-डायस प्लॉट मधील अधीकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे ,अविनाश रमेश बागवे ,रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारासाठी आज पुण्यातील हरकानगर काशेवाडी येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते .

पुढे ते म्हणाले की ,आता हे सरकार महापालिकेत ही सफाई कामाचे खाजगी कंत्राट देऊ पाहत आहे .त्यामुळे झाडूकामगार यांचा वारस हक्क त्यांना घाणभत्ता बंद करायचा आहे .म्हणूनच आता सर्वसामान्य नागरिकांनी आणि महिलांनी फक्त काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे असे आवाहन पाटील यांनी केले .यावेळी अविनाश बागवे यांनी सतेज पाटील यांचे स्वागत केले .
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री रमेश बागवे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की ,काशेवाडी आणि हा पूर्ण परिसर काँग्रेस पक्षाचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला आहे .त्यामुळे पुण्यातील सर्वाधिक लिड ने या प्रभागातील काँग्रेस व शिवसेना (ठाकरे ) पक्षाचे उमेदवार विजय होतील असा विश्वास व्यक्त केला .

या जाहीर सभेस माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे, जेष्ठ नेते चंद्रकांत चव्हाण,कविराज संघेलिया विठ्ठल थोरात, यासेर बागवे, दयानंद अडागळे, रशीद खिजर,हुसेन शेख,राजू मोरे, मोहन माने, दिलीप कांबळे, व परिसरातील महिला ,युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading