Monday, September 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सध्या आम्ही जात्यात आहोत आणि तुम्ही सुपात ; जानकरांचा शिंदे व अजीतदादांना इशारा

सोलापूर: प्रतिनिधी

सध्या आम्ही जात्यात आहोत आणि तुम्ही सुपात  आहात. मात्र पुढे मागे कधीतरी तुम्हालाही जात्यातच यायचे आहे, असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सावधगिरीचा इशारा दिला.

सध्या ऑपरेशन लोटस मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये केवळ विरोधी पक्षातूनच नव्हे तर महायुतीतील मित्रपक्षातूनही नेत्यांची आयात केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जानकर यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

एकेकाळी महादेव जानकर हे देखील भाजपच्या जवळ होते. मात्र, ही मैत्री दीर्घकाळ टिकू शकली नाही. महादेव जानकर महायुती पासून दूर गेले तरीही आपण महायुती सोडणार नाही, असे त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे.

पंकजा याच गोपीनाथ मुंडे यांच्या वारस

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसाबाबत ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरून राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. महादेव जानकर यांनीही त्याबाबत भाष्य केले. मंत्री पंकजा मुंडे याच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांची दुसरी वारस प्रीतम, तिसरी यशस्वी तर चौथा वारसदार महादेव जानकर असल्याचे खुद्द मुंडे यांनी जाहीर सभेत सांगितले असल्याचा दावाही त्यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading