महादेव जानकर यांची साथ सोडणार त्यांचा आमदार
परभणी: प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुती बरोबर आले नाहीत तर आपण त्यांची साथ सोडू पण महायुती बरोबरच राहू, अशा शब्दात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मला माझ्या आई-वडिलांनी जन्माला घातले असले तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे राजकारणातील बाप आहेत. त्यामुळे आपण त्यांना सोडू शकत नाही, असेही गुट्टे म्हणाले.
जानकर हेच माझे नेते आहेत. टेलर महायुती बरोबर आहे आणि त्यांनी मला उमेदवारी दिली तरच मी निवडणूक लढवीन. अन्यथा लढवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला जनतेने निवडून दिले आहे. जनतेच्या विकासाची कामे करायची आहेत. त्यासाठी सत्तेत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण महायुतीची साथ सोडू शकत नाही, असेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर गुट्टे यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. त्याचा परभणीचा राजकारणावर उल्लेखनीय परिणाम होण्याची शक्यता आहे.
