Monday, September 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पढल्या बद्दल अज्ञात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे: प्रतिनिधी 

शनिवारवाड्याच्या आवारात शुक्रवारी नमाज पढल्याबद्दल विश्रामबागवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. 

काही मुस्लिम महिलांनी शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पढल्याचे व्हिडिओज समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले. त्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्यावर धाव घेतली. अशा प्रकारची अतिक्रमणे यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा देतानाच मेधा कुलकर्णी यांनी संबंधित जागेचे शुद्धीकरण केल्याचे सांगितले. 

प्रत्येक गडकिल्ल्यावर अतिक्रमण करून, नमाजपठण करून जागा बळकावल्या गेल्या आहेत. काही काळानंतर या जागा वक्फ बोर्डाच्या असल्याचे सांगितले जाते. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. हिंदू समाज आता जागा झाला आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. या पुढील काळात आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणतीही मजार दिसणार नाही, याची काळजी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading